Home | Business | Gadget | Google launches art and culture app in Indias Mobile congress

घरी बसून करा जगाची सफर, Google ने लाँच केले आर्ट अँड कल्चर अॅप

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 30, 2017, 02:33 PM IST

नवी दिल्ली - सर्च इंजिन गुगल तुम्हाला घरात बसल्याबसल्या देशासह जगाची सफर घडवून आणणार आहे. दिल्ली येथे सुरु असलेल्या इंडि

 • Google launches art and culture app in Indias Mobile congress
  नवी दिल्ली - सर्च इंजिन गुगल तुम्हाला घरात बसल्याबसल्या देशासह जगाची सफर घडवून आणणार आहे. दिल्ली येथे सुरु असलेल्या इंडियन मोबाईल काँग्रेसच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी गुगलने आर्ट अँड कल्चर हे अॅप लाँच केले. हे अॅप एंड्रॉईड आणि आयफोनवर वापरता येते. अॅप डाऊनलोड केल्यानंतर युजर्स घरी बसून कोणत्याही ठिकाणी सफर करू शकतो. हे अॅप व्हर्चुअल बायोस्कोप तंत्रासारखे काम करेल. त्यामुळे युजर्सला त्याठिकाणचा आनंद घेता येईल.
  - या अॅपने देशभरातील 184 पर्यटन स्थळांसह संग्रहालयांनाही जोडण्यात आले आहे. सोबतच जगभरातील 1500 पेक्षा अधिक पर्यटनस्थळांची सफर तुम्हाला हे अॅप घडवून आणेल. या स्थळांचे फोटो, व्हिडीओ, माहिती आणि लिटरेचरही जोडण्यात आले आहेत.
  - अॅपवर असलेल्या स्थळांपैकी कोणत्याही एका स्थळाचे नाव टाईप करून तुम्हाला त्या पर्यटन स्थळांचा रिअल फिल घेता येणार आहे.
  - दक्षिण-पूर्व आशियात गुगलचे उपाध्यक्ष राजन आनंदम यांनी सांगितले की, संग्रहालय आणि पर्यटन स्थळांच्या चित्रीकरणासाठी भारतीय पुरातत्व खात्याची मदत घेतली आहे.
  2500 रुपयांत थ्री-डी स्क्रिन
  - आर्ट अँड कल्चर अॅपशिवाय गुगलने एक खास किट लाँच केले. या माध्यमातून व्हर्चुअल पर्यटनाचा अनुभव घेता येईल.
  - अॅपच्या माध्यमातून या लोकेशनशी संबंधित साहित्याची माहितीही घेता येईल. व्हर्चुअल टूर दरम्यान तुम्ही यासंदर्भात माहीतीही वाचू शकता. इतकेच नव्हे तर तुम्ही ऑडीओही ऐकू शकता.

Trending