आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगलकडून मराठी भाषेला गिफ्ट, 7 भाषांना मिळेल ही ऑफलाईन सुविधा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅझेट डेस्क - गुगलकडून भारतीय 7 भाषांना ऑफलाईन ट्रान्सलेशनचे गिफ्ट मिळाले आहे. आतापर्यंत गुगल ट्रान्सलेटचे अँड्रॉईडवर चालणारे अॅप्लिकेशन फक्त ऑनलाईन वापरता येत होते. मात्र, ऑनलाईन सुविधा वापरतांना युजर्सला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागायचे. ही अडचण लक्षात घेऊन गुगलने जगातील 56 भाषांना ऑफलाईन सपोर्ट सुविधा सुरु केली आहे. 
 
- या भारतीय भाषांमध्ये मराठी, गुजराती, बंगाली, कन्नडा, तामिळ, तेलगू आणि उर्दूचा या सात भाषांचा समावेश आहे.
 
- गुगल ट्रान्सलेट काही भाषांसाठी कन्व्हर्सेशन मोडलाही सपोर्ट करणार आहे.
 
- या सुविधेमुळे या सात भाषांमधील वाक्य अथवा शब्द ऑफलाईनसुद्धा भाषांतर करता येणार आहे.
 
- ही सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला सुरवातीला ऑफलाईन सपोर्ट फाईल्स डाऊनलोड करणे गरजेचे आहे.
 
- त्याचबरोबर थेट कॅमेऱ्याने फोटो काढून अथवा गॅलरीत असलेल्या छायाचित्रावरून मजकूर भाषांतर करण्याचीही सुविधा या भाषांना मिळणार आहे.
 
- या वर्षाच्या सुरवातीला नव्या युजर्सला आकर्षित करण्यासाठी गुगलने अनेक बदल केले.
 
- गुगलने नुकतेच आठ भाषांसाठी  voice input support  चीही घोषणा केलेली आहे.
 
- Google's speech recognition सध्या 119 भाषांना सपोर्ट करते.
बातम्या आणखी आहेत...