Home »Business »Gadget» Here Is How To Select The Processor Of A Smartphone

स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी आवर्जून तपासा या 2 गोष्टी, होऊ शकते फसवणूक

दिव्य मराठी वेब टीम | Oct 02, 2017, 10:47 AM IST

नवी दिल्ली -दिवसेंदिवस स्मार्टफोन आता अधिक स्मार्ट होतोय. खऱ्या अर्थान ज्या फोनचा प्रोसेसर स्मार्ट असतो, तोच फोन स्मार्ट मानला जातो. तुमच्या फोनचा प्रोसेसर चांगला नसेल, तर तुम्ही मोबाईलवर वेगाने काम करणे विसरुण जा. बहुतेकवेळा याबाबत मोबाईल विक्रेत्यांकडून माहिती दिली जात नाही.
प्रोसेसर चांगला नसेल, तर त्या मोबाईलची किंमत देखील कमी असते. अशावेळी ग्राहक भुलथापांना बळी पडून स्वस्तात मोबाईल खरेदी करतात. पण त्यानंतर पश्चाताप करण्याशिवाय काहीही शिल्लक राहत नाही. त्यामुळी ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. या आधारे तुम्हाला नवा फोन खरेदी करण्यापूर्वी प्रोससर तपासण्यासाठी मदतच होईल.
प्रोसेसर म्हणजे काय?
प्रोसेसर हा स्मार्टफोनचा आत्मा मानला जातो. याशिवाय तुमचा फोन वेगाने कोणतेही काम करू शकणार नाही. जिका चांगला प्रोसेसर तितके या फोनचा आऊटपुट अधिक मिळेल.
कसा निवडावा बेस्ट स्मार्टफोन?
स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी अनेक बाबी लक्षात ठेवाव्या लागतात. मात्र कोर आणि गिगा हर्टझ या दोन गोष्टी स्मार्टफोनच्या खास बाबी असतात. त्यामुळे फोन खरेदी करतांना या दोन गोष्टी जरुर बघाव्यात.
कोणत्याही फोनचा परफार्मन्स हा त्या कोर वर अवलंबून असतो. सध्या बाजारात ऑक्टा कोर प्रोसेसर उपलब्ध आहे. यामध्ये 4 लहान आणि 4 मोठया कोरचा समावेश असतो. तांत्रिक भाषेत याला ऑक्टा कोर प्रोसेसर म्हटले जाते.
ज्या फोनमध्ये जास्तीत जास्त कोर असतील, तितकी त्या फोनची कार्यक्षमता अधिक असते. सुरवातीला 2 कोर असलेला फोन असायचा. याचाच अर्थ हे काम दोन लोक करायचे. आता तेच काम 8 जण करतात.
गीगा हर्टझवरही असू द्या लक्ष
गीगा हर्टझ प्रोसेसरला अधिक गती मिळवून देतो. सध्या बाजारात 2 गीगा हर्टझ क्षमतेचे प्रोसेसर उपलब्ध आहेत. एखाद्यावेळी तुमच्या फोनमध्ये गीगा हर्टझ जास्त असल्यास 8 कोरपेक्षा अधिक स्पीड तुमचा मोबाईल देऊ शकेल. दोन्हींचे कॉम्बिनेशन योग्य असल्यास फोन सर्वाधिक गतीने काम करू शकतो.
मार्केटमध्ये सध्या स्नॅपड्रॅगन, मीडिया टेक 2 प्रोसेसर उपलब्ध आहे. स्नॅपड्रॅगन प्रोसेसर मीडियाटेकच्या तुलनेत चांगला काम करतो. 10 हजार रुपयांच्या रेंजमध्ये असलेल्या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर मिळू शकतो. स्नॅपड्रॅगन 430 आणि 435 सुद्धा चांगला काम करतो.

Next Article

Recommended