Home »Business »Gadget» How Whatsapp Makes Money

ना कोणती जाहिरात, ना कोणते चार्जेस... तरीही व्हाट्सअॅपला होते भरपूर कमाई, हा आहे फंडा

नवी दिल्ली - तुम्हाला माहिती आहे का व्हाट्सअॅप आणि फेसबुकची कमाईची साधने कोणती आहेत? व्हाट्सअॅपवर कोणतीही जाहिरात नसते क

दिव्य मराठी वेब टीम | Oct 09, 2017, 12:19 PM IST

नवी दिल्ली -तुम्हाला माहिती आहे का व्हाट्सअॅप आणि फेसबुकची कमाईची साधने कोणती आहेत? व्हाट्सअॅपवर कोणतीही जाहिरात नसते किंवा युजर्सकडून कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाहीत. मग प्रश्न पडतो, की व्हाट्सअॅपला कमाई कुठून होते? आज आम्ही तुम्हाला सांगतोय, की व्हाट्सअॅप आणि फेसबुकच्या कमाईची साधने...
तुम्हाला लक्षात असेल तर फेबसुकने 19 बिलियन डॉलर खर्च करून व्हाट्सअॅप खरेदी केले. इन्स्टाग्राम पूर्वीपासून फेसबुकचेच आहे. त्यामुळे फेसबुकने या तिन्हींचे एक जाळे तयार केले आहे. त्या माध्यमातून फेबसुकला बक्कळ कमाई होते. ही कमाई जाहिरातीद्वारेच होते. मात्र, या कमाईच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक युजर्सच्या टाईमलाईनला ज्या जाहिराती दिसतात, त्याचे पैसे फेसबुकला मिळतात.
अशी कळते तुमची आवड?
तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की, फेसबुकला तुमच्या आवडीनिवडीविषयी कसे कळते? तर त्याचे उत्तर खूप सोपे आहे. फेसबुक तुमच्या पोस्ट, तुमची आवडीची ठिकाणे, तुम्ही शेअर केलेल्या पोस्ट, लाईक केलेल्या पोस्ट याची माहिती मिळवतो. त्याच्या विश्लेषणातून तुमच्या आवडीनिवडींची माहिती फेसबुकला कळते. त्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टींची आवड आहे, त्याचीच जाहिरात तुमच्या टाईमलाईनवर दिसायला सुरवात होते.
पुढील स्लाईडवर वाचा - व्हाट्सअॅप आणि इन्स्टाग्राम कमाईची साधने...
---

Next Article

Recommended