आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खिशात घेऊन फिरा हा प्रिंटर, ताबडतोब करा सेल्फी प्रिंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कदाचित कोणी म्हटले असते, की तुम्ही खिशात प्रिंटर घेऊन जाऊ शकता का? तर तुम्ही सहज म्हटले असता की, काहीही बोलाताय का?  पण आता हे शक्य आहे. तुम्ही अगदी तुमच्या खिशात घेऊन फिरू शकता. जगातील अग्रणी कंपनी एचपीने पॉकेट साईज असलेला स्प्रॉकेट लाँच केला आहे. या माध्यमातून स्मार्टफोनचा वापर करून मोबाईल फोनमध्ये स्टोअर केलेले फोटो सहज प्रिंट करू शकता. 
 
किंमत 8999 रुपये
भारतात हा पॉकेट साईज प्रिंटर अॅमेझॉनवर खरेदी करता येऊ शकता. या प्रिंटरची किंमत केवळ 8999 रुपये इतकी आहे. भारतासह हा प्रिंटर अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलियामध्ये उपलब्ध होणार आहे. कंपनीने सांगितले की, फोटो काढल्यानंतर चांगले फोटो मोबाईलमध्ये स्टोअर केले जातात. त्यानंतर प्रिंट करण्याची इच्छा असली तरीही होत नाही. त्यांच्यासाठी हा प्रिंटर वरदान ठरणार आहे. त्यामुळे फोटो काढल्यानंतर जागेवरच तुम्ही प्रिंट करण्याची सोय कंपनीने उपलब्ध करून दिली आहे.
 
वापरण्यास अगदी सोप्पा
एचपी इंडियाचे वरिष्ठ संचालक राजकुमार ऋषी म्हणाले की, आपल्या क्षणांना साठवून ठेवण्यासाठी एचपीने हा प्रिंटर लाँच केला आहे. त्यामुळे मोबाईलमध्ये काढून ठेवलेले फोटो प्रिंट करून आठवणीच्या कप्प्यात ठेवू शकता. त्याशिवाय शाळेतील प्रोजेक्टही याद्वारे करणे सोपे होतील.
 
मोबाईलने कनेक्ट होईल प्रिंटर
मोबाईल युजर्स हा प्रिंटर ब्लूटूथद्वारे कनेक्ट करू शकता. या प्रिंटरच्या वापराने दोन बाय तीन आकारातील प्रिंट करू शकता. या प्रिंटरमध्ये झिंक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. यासाठी लागणाऱ्या कागदाची किंमत 20 पेपरसाठी 539 रुपये, तर 50 पेपरसाठी 1249 रुपये एवढी असेल.
 
बातम्या आणखी आहेत...