आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वास नाही बसणार.. htcच्या या स्मार्टफोनवर मिळतोय 23 हजार रुपयांचा डिस्काऊंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - धनत्रयोदशीनिमीत्त स्मार्टफोन युजर्ससाठी खुशखबर आहे. तैवानची कंपनी असलेल्या एचटीसी यू अल्ट्रा या स्मार्टफोनवर 22 हजार 991 रुपययांचा भरघोस डिस्काऊंट जाहीर केला आहे. मात्र, ही ऑफर मर्यादित काळापर्यंत राहणार आहे.
 
तैवानच्या या कंपनीने धनत्रयोदशीनिमीत्त हा फोन सर्वात स्वस्त विकण्याचा निर्णय घेतला. या फोनची खरी किंमत 52 हजार 990 रुपये आहे. मात्र, या डिस्काऊंट ऑफरमुळे हा फोन तुम्हाला फक्त 29 हजार 990 रुपयांत खरेदी करता येणार आहे. एचटीसीने आपल्या ई-कॉमर्स साईटवर या फोनच्या ऑफरची माहिती दिली आहे. 
 
हा फोन फेब्रुवारीमध्ये लाँच करण्यात आला होता. या फोनला ड्युएल डिस्प्ले आहे. लाँचिंगवेळी या फोनची किंमत 59 हजार 990 रुपये होती. आज हा फोन फक्त 29 हजार रुपये 990 रुपयांत खरेदी करता येणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...