आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात स्वस्त मेड इन इंडिया 4G स्मार्टफोन, हे आहेत वैशिष्ट्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिझनेस डेस्क - भारतीय स्मार्टफोन उत्पादक इंटेक्स कंपनीने intex Aqua 5.5 VR+ हा नवा बजेट सेग्मेंटमधील स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन फ्लिपकार्टवर फक्त 5799 रुपयांमध्ये लवकरच उपलब्ध होणार आहे. या फोनसह जियो 25GB 4G डाटा मोफत दिला जाणार आहे. हा स्मार्टफोन VR फोन आणि 3D कॉन्टेंटसह असेल. कंपनीने या फोनमध्ये हायटेक फिचर्स दिलेले आहेत. intex Aqua 5.5 VR+ मध्ये 5.5 इंच इतका HD डिस्प्ले देण्यात आला आहे. या मोबाईलच्या बॅटरीची क्षमता 2800mAh इतकी आहे. 
 
कंपनीचा हा दुसरा फोन आहे, जो Aqua सिरीजमध्ये लाँच करण्यात आला आहे. यापूर्वी intex ने Aqua Note 5.5 लाँच केला होता. इंटेक्स टेक्नोलॉजीच्या उत्पादन हेड इशिता बंसल यांनी सांगितले की, आम्ही कमी बजेटमध्ये सर्वाधिक फिचर्स देण्यास प्रतिबद्ध आहोत. या बजेटमध्ये VR हेडसेट सह येणारा हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचा दावाही त्यांनी केला.
 
पुढील स्लाईडवर वाचा - फोनचे इतर फिचर्स
 
बातम्या आणखी आहेत...