आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज Apple ला आहे दबंग होण्याची संधी, हे आहे कारण..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगभरातील अॅप्पल प्रेमी सध्या iPhone 8च्या प्रतीक्षेत आहेत. iPhone 8 च्या लाँचिंगनंतर कंपनीचे भाग्य पालटण्याची अपेक्षा अॅप्पलच्या संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आहे. आयपॅड आणि आयफोनच्या चांगल्या विक्रीसह आयफोन 8 च्या जोरदार विक्रीनंतर अमेरिकेची ही अॅप्पल कंपनी जगातील दबंग कंपनी बनू इच्छित आहे. iPhone 8 च्या लाँचिंगनंतर जगातील पहिली कंपनी अशी होऊ शकते, ज्याचे बाजारमूल्य 1000 अब्ज डॉलर इतके असेल.
 
मार्केट वॉचमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, अॅप्पलचे तिमाही परिणाम नुकतेच घोषित झाले. त्यांनतर कंपनीचे बाजारातील मूल्य 56 अब्ज डॉलरने वाढले. 
 
गुंतवणूक क्षेत्रातील कंपनी आरबीसी कॅपिटलच्या तज्ज्ञांनुसार, अॅप्पलच्या शेअर्समध्ये तेजीने वाढ होत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे कंपनीकडून आयफोन 8 चे लाँचिंग होणार आहे. त्यामुळे कंपनीला मोठा फायदा होण्याचा अंदाज तज्ज्ञंनी व्यक्त केला आहे. 
 
अॅप्पल कंपनीमध्ये बाजारातील 1000 अब्ज डॉलर इतका बाजारातील वाटा मिळविण्याची क्षमता आहे. त्यानंतर पुढील 12 ते 18 महिन्यांनी यापेक्षा अधिक गुंतवणूक ओढण्याची क्षमता अॅप्पलमध्ये आहे.
 
विश्लेषकांनी सांगितले, की नव्या आयफोनच्या सादरीकरणानंतर कंपनीला प्रत्येक शेअरमागे 12 डॉलरचा फायदा होईल. त्यामुळे कंपनीच्या आपोआप नफा वाढून कंपनीचे बाजारमूल्य वाढेल.
 
त्याशिवाय अॅप्पलच्या शेअरची किंमत 160 डॉलरहून वाढून 192 डॉलरपर्यंत पोहचू शकते. त्यानुसार कंपनीचे बाजारमूल्य 1000 अब्ज डॉलर इतके पोहचेल. त्यामुळे कंपनीला जागतिक स्तरावर दबंग होण्याची संधी आहे. 
बातम्या आणखी आहेत...