Home »Business »Gadget» IPhone 8 Launch: IPhone X Will Launch With The IPhone 8 And IPhone 8 Plus - Full Phone Specifications

iPhone 8 पेक्षा पॉवरफुल मॉडेल अॅपल करणार लाँच, सर्वप्रथम येथे पाहा सरप्रायझिंग फीचर्स

दिव्य मराठी वेब टीम | Sep 11, 2017, 19:51 PM IST

नवी दिल्ली - बहुप्रतिक्षीत अॅप्पल कंपनीचा iPhone 8 येत्या 12 सप्टेंबरला सॅन फ्रान्सिस्को येथे लाँच होणार आहे. या फोनबद्दल असंख्य अफवांना पेव फुटलेले आहे. यातील असलेल्या फिचर्सबद्दल सर्वांना आकर्षण आहे. मात्र, हा फोन कसा असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. अॅप्पलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार iPhone 8 सह iPhone 8 plus आणि iPhone x हे फोन लाँच होणार आहेत. हे तिन्ही मॉडल कंपनीचे फ्लॅगशिप मॉडल असतील.
iPhone x च्या लाँचिंगचे हे आहे कारण
यावेळी अॅप्पल iPhone x हा मॉडल लाँच करणार आहे. अॅप्पलच्या प्रवक्त्याने सांगितले, की अॅप्पलने यंदा दहा वर्षे पूर्ण केले आहे. त्यानिमीत्त iPhone x हा लाँच केला जाणार आहे. रोमन लिपीत x चा अर्थ 10 असा होतो. त्यामुळे या फोनचे नाव iPhone x असे असेल.
पुढील स्लाईडवर वाचा - हे आहेत फिचर्स

Next Article

Recommended