आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive : अॅपलच्या नवीन कॅम्पसमधील Inside Photo, खास तुमच्यासाठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगातील अग्रगण्य अॅपल कंपनीचा नवा कॅम्पस तयार झालेला आहे. हा कॅम्पस यूएसएच्या कूपर्टीनो शहरात तयार करण्यात आला आहे. पहिल्यांदा अॅप्पलचा वार्षिक इव्हेंट कंपनीच्या कँम्पसमध्ये होणार आहे. या कँम्पसमध्ये स्टिव्ह जॉब्स यांचे थिएटर बनविण्यात आले आहे. काही तासानंतर याठिकाणी iphone 8 लाँच होणार आहे.
 
अॅपलचे प्रोडक्ट मॅनेजर सिद्धार्थ राजहंस म्हणाले, की स्टिव्ह जॉब्स यांच्या स्वप्नातील कँपस तयार करण्यात आला आहे. यासंदर्भात काही खास गोष्टी जॉब्स यांनी एका सहकाऱ्याकडे सांगितल्या होत्या. कंपनीचा हा पहिला ग्रीन कॅम्पस आहे.
 
थिएटरमध्ये बसू शकतील 7 हजार नागरिक
 
स्टिव्ह जॉब्स थिएटरमध्ये 7 हजार लोक बसण्याची क्षमता आहे. हा संपूर्ण परिसर 175 एकरात पसरलेला आहे. याठिकाणी एकूण 12 हजार कर्मचारी काम करू शकतात. या कॅम्पसच्या पार्किंगमध्ये 7 हजारापेक्षा अधिक गाड्या पार्क करता येऊ शकतील.
 
लिफ्टचे बटन आयकॉनिक लोगोसारखे
 
अॅपलचा आयकॉनिक लोगो सफरचंदासारखा आहे. नव्या कॅम्पसमध्ये बसविण्यात आलेल्या लिफ्टमध्ये बटन सुद्धा आयकॉनिक लोगोप्रमाणे वापरले आहे. संपूर्ण कॅम्पसमध्ये सोलार आणि विंड एनर्जीचा वापर करण्यात आला आहे. 
 
5 बिलियन यूएस डॉलर लागला खर्च
 
अॅपलच्या कॅम्पससाठी तब्बल 5 बिलियन यूएस डॉलर इतका खर्च आला आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण कॅम्पस ग्रीन आहे. कॅम्पसचे बांधकाम करतांना त्याठिकाणी असलेले झाडे तोडण्याऐवजी रिलोकेट करण्यात आले. कॅम्पसमध्ये ओपन स्पेस मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आली आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा - अॅपलच्या नव्या कॅम्पसचे फोटो
बातम्या आणखी आहेत...