आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JioPhoneवर कॉलिंग राहील नेहमीसाठी Free, जाणून घ्या 12 वैशिष्ट्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत Jio ने नवा धमाका करत 4G फीचर फोन लाँच केला आहे. हा फोन सर्व युजर्ससाठी फ्रीमध्ये उपलब्ध करण्यात येईल. फोनचा डेमो आकाश आणि ईशा अंबानी यांनी सादर केला. हा फोन व्हाइस कमांडवरही काम करेल. म्हणजेच तुम्ही फक्त तुमच्या आवाजाने एखाद्याला कॉल अथवा मेसेज करू शकाल. सोबतच तुमच्या बोलण्याने गाणेही सुरू करता येईल. याला मुकेश अंबानींनी इंटेलिजेंट फोन असल्याचे म्हटले आहे. या फोनवर व्हाइस कॉलिंग नेहमीसाठी फ्री राहील. डाटासाठीच रिचार्ज करावे लागेल ज्याची किंमतही खूप कमी राहील. मुकेश अंबानी यांनी फोन लाँच करत म्हटले की, हा फोन आल्यानंतर भारतात बाराही महिने 2G कव्हरेजहून जास्त 4G कव्हरेज असेल.
 
द्यावे लागेल 1500 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट
हा फोन पूर्णपणे फ्री आहे, परंतु युजर्स याला खरेदी करण्यासाठी 1500 रुपयांचे सिक्युरिअी डिपॉझिट करावे लागेल जे 3 वर्षांनंतर रिफंड केले जाईल. या फोनची प्री बुकिंग 24 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. सप्टेंबरपासून मिळायला लागेल. डिसेंबरपर्यंत सर्व युजर्सपर्यंत फोन पोहोचलेला असेल. हा फोन प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्त्वावर दिला जाणार आहे. प्रत्येक आठवड्यात 50 लाख फोन दिले जातील. हा फोन पूर्णपणे भारतात बनलेला आहे. 
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, जियो फोनची 12 महत्त्वाची वैशिष्ट्ये
बातम्या आणखी आहेत...