आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जियोफाई डीव्हाइस मिळणार फक्त रु. 999, रिलायन्स जिओची नवी ऑफर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिझनेस डेस्क - सणासुदीच्या दिवसात 'रिलायन्स जिओ'ने आता ई-कॉमर्स कंपन्यांना टक्कर देत ई-कॉमर्स कंपन्यांप्रमाणे ऑफर सादर केली आहे. 'जिओ'ने फक्त रु.999 मध्ये जिओफाय डोंगल देण्याची घोषणा केली आहे. याआधी डोंगल घेण्यासाठी ग्राहकांना रु.1999 खर्च करावे लागत होते. ग्राहकांना जिओफाय डोंगलवर तब्बल 1 हजार रूपयांची सवलत देऊ केली आहे.
 
सणासुदीच्या दिवसांसाठी जिओकडून देण्यात आलेली ही ऑफर मात्र मर्यादित दिवसांसाठी असेल. त्यामुळे ग्राहकांना 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान जिओफाय डोंगल खरेदी करून ऑफरचा फायदा घेता येणार आहे. याआधी देखील जिओफाय डोंगलसाठी ऑफर देण्यात आली होती. त्यामध्ये एकदा रु.1999 डोंगल खरेदी केल्यास त्यावर तेवढ्याच किंमतीचा मोफत डेटा देण्यात आला होता.
 
आता जिओच्या नव्या रु.999 च्या ऑफरनुसार जिओफाय खरेदी करणा-यांना चार रिचार्ज सायकलपर्यंत 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉल्स, 2जीबीपर्यंत 4जी डेटा प्रति दिवस मिळणार असून, दररोज 100 एमएमएस मोफत किंवा 6 रिचार्ज सायकलपर्यंत 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉल्स, 1 जीबीपर्यंत 4जी डेटा देण्यात येणार आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...