Home »Business »Gadget» Know How Vishing Attack Get Done Via Mobile Phones

सावधान... मोबाईलच्या या फ्रॉडपासून करा स्वत:चा बचाव, बक्षिसांच्या नावाखाली होऊ शकते फसवूणक

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 11:10 AM IST

नवी दिल्ली -हॅकर्स संगणक, लॅपटॉप आणि ईमेलद्वारे फ्रॉड करण्यापेक्षा आता मोबाईल फोनने लोकांच्या खात्यांची माहिती घेतात. यापूर्वी हॅकर्स मेल करून तुम्ही लाखो कोटी रुपये जिंकल्याबद्दल अभिनंदन करायचे. या माध्यमातून हॅकर्स तुमची बँकेची इत्यंभूत माहिती मिळवून फ्रॉड करत होते. आता हॅकर्स फोनवर कॉल करून तुमचा खाते क्रमांक, क्रेडिट कार्ड क्रमांक घेण्याचा प्रयत्न करतात. दिवाळीनिमीत्त अशा भुलथापांना बळी पडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे वेळीच सावरून या फ्रॉडपासून स्वत:चा बचाव करण्यातच फायदा आहे.
शक्यतो हॅकर्सकडून येणारे फोन हे बँकेतूनच असल्याचे भासवले जाते. तुम्हाला विश्वासात घेऊन ते डेबिट, क्रेडिट आणि बँकेची माहिती घेतात. पाहता-पाहता तुमचे खाते रिकामे करण्यास सुरवात करतात. यासारखे असंख्य प्रकरणे समोर आली आहेत. जोपर्यंत तुम्हाला पैसे खात्यातून गेल्याची माहिती कळेपर्यंत तुमचे खाते साफ झालेले असते. यालाच विशिंग फ्रॉड असेही म्हणतात.
पुढील स्लाईडवर वाचा - मोबाईलद्वारे कसा होतो विशिंग फ्रॉड

Next Article

Recommended