आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7000 रुपयांच्या या 4G फोनला आहे 13MP कॅमेरा, 4000mAH बॅटरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिझनेस डेस्क - स्मार्टफोन उत्पादक कंपनी कुल्ट इंडियाने सर्वात स्वस्त असलेला 4G स्मार्टफोन लाँच केला. फक्त 6999 रुपये किंमत असलेल्या या फोनला ग्लॅडिएटर असे नाव देण्यात आले आहे. 5.5 इंच HD IPS डिस्प्ले असलेल्या या फोनचे रेजोल्यूशन 1280 x 720 इतके आहे.
 
या फोनमध्ये 64 बिट क्वालकोअर एमटीके 6737 प्रोसेसर आहे. विशेष म्हणजे या मोबाईलला 3 जीबी इतकी जबरदस्त रॅमसह 32 जीबी रॉम देण्यात आली आहे. हा अँड्रॉईड फोन 7.0 नॉगटवर रन होतो. इतके सारे फिचर असलेला हा सर्वात स्वस्त फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 
 
13MP ऑटोफोकस रिअर कॅमेरा
या फोनमध्ये 13MPचा ऑटोफोकस रिअर कॅमेरा आहे. यामध्ये एलईडी फ्लॅशसह सेल्फी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. सर्वात महत्तवाचे म्हणजे या फोनची बॅटरी 4000mAH इतक्या क्षमतेची आहे. सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
गुगल अॅसिस्टंटचे फिचर
हा फोन कनेक्टिव्हीटीच्या बाबतीत Micro USB, a 3.5mm headset jack, OTG, FM Radio, Bluetooth 4.0, Wi-Fi 802.11 b/g/n, GPS आणि hotspot ला सपोर्ट करतो. त्याशिवाय इन्स्टंट अनलॉक, पिनाईट मोड, रिडींग, मोबाईल ट्रॅकर आणि गुगल अॅसिस्टंटसारखे फिचर देण्यात आले आहेत. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - या तारखेपासून मिळणार ग्राहकांच्या हातात
बातम्या आणखी आहेत...