Home | Business | Gadget | Large scale money fraud with the company mobikwik

mobikwik वॅलेटमधून 6 हजार खात्यात 19 कोटी ट्रान्सफर, फसवणूकीचा गुन्हा दाखल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 30, 2017, 11:35 AM IST

गुडगाव - ई-कॉमर्स क्षेत्रातील मोबिक्विक या कंपनीची 19 कोटीपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. कंपनीन

 • Large scale money fraud with the company mobikwik
  गुडगाव - ई-कॉमर्स क्षेत्रातील मोबिक्विक या कंपनीची 19 कोटीपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. कंपनीने तक्रारीत म्हटले आहे की, मोबिक्विकच्या ई-वॅलेटचा वापर करून हरियाणा, पंजाब, पश्चिम बंगालसह अनेक राज्यातील सहा हजार बँक खात्यात संशयितरित्या पैसे ट्रान्सफर झाले. एखाद्या हॅकरने हे काम केले असावे. गुडगाव पोलिस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 100 पेक्षा अधिक खाते गोठवले आहेत.
  - गुडगाव पोलिस मनीष सहगल यांनी सांगितले की, कंपनीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सायबर गुन्ह्याखाली या प्रकरणाची नोंद केली आहे. शुक्रवारी सायबर विभागने यासंदर्भात खोलात चौकशी सुरु केली आहे.
  - हा नेमका ऑनलाईन फ्रॉड आहे की कंपनीची तांत्रिक अडचण आहे, याचा शोध पोलिंसाकडून घेतला जात आहे. त्याशिवाय 100 हून अधिक खाते बंद करण्यात आले. कुरुक्षेत्र परिसरातील एका खात्यात 2 कोटी रुपये जमा झाले आहेत.
  युजर्सचे नव्हे, कंपनीचे नुकसान
  कंपनीने सांगितले की, मोबिक्विक या डिजीटल वॉलेटमधून 19.60 कोटी रुपये संशयितरित्या वेगवेगळ्या बँकांच्या खात्यात जमा झाले. एखाद्या हॅकर्सने हे केले असावे.
  - कंपनीने सांगितले की, वॉलेटचे युजर्स, त्यांचे पैसे आणि माहिती अत्यंत सुरक्षित आहे. जे काही नुकसान झाले ते कंपनीचे, ग्राहकांना याचा फटका बसणार नाही.
 • Large scale money fraud with the company mobikwik
 • Large scale money fraud with the company mobikwik

Trending