आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Google ने लाँच केले पेमेंट अॅप Tez, बँक डिटेल्सशिवाय करू शकता व्यवहार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशात मोबाइल पेमेंट प्रणालीत गुगलने शिरकाव केला. सोमवारी गुगलने अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत ऑनलाइन डिजिटल पेमेंट अॅप तेज लाँच केले. युजर्सना याद्वारे यूपीआय अॅड्रेस, मोबाइल क्रमांक, अकाउंट किंवा क्यूआर कोडचा वापर करून पैस पाठवण्याची सुविधा मिळेल. यामध्ये ५० महिन्याला हजार रुपयांची मर्यादा आहे. यासाठी ‘तेज’ बँक खात्याला जोडावे लागेल. हे अँड्राइड व आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी आहे. वैयक्तिक माहिती व बँक अकाउंट विवरण न देताही व्यवहार करता येतील. तेज हिंदी व इंग्रजीसह ८ भाषांना सपोर्ट करते. यामुळे पेटीएम,मोबीक्विकला स्पर्धक मिळेल.
 
तेजचा सेटअप असा करा
 डाऊनलोडनंतर १० आकडी मोबाइल क्रमांक मागेल, हा बँक खात्याशी जोडलेला असेल. Á यानंतर गुगल पिन किंवा स्क्रीन लॉक सेट करावा लागेल. Á मोबाइलवर एक संदेश येईल व या क्रमांकाने लिंक खात्यास स्वत:हून समाविष्ट करून घेईल. Á आता ऑप्शनमध्ये जाऊन पैसे पाठवू शकता.
 
कोणासही पैसे पाठवण्यासाठी ‘तेज’चा वापर असा करा
- पैसे पाठवण्यासाठी क्रेडिट, डेबिट कार्डवरील शेवटचे ६ अंक व मुदत समाप्तीची तारीख द्यावी लागेल. यानंतर पैसे पाठवू शकता. फंड ट्रान्सफरसाठी अॅप आधीचा पिन मागेल.
-  ब्ल्यूटूथप्रमाणे कॅश मोडनुसार जवळच्या लोकांना फंड ट्रान्सफर करू शकता. रुपयाच्या चिन्हावर क्लिक करून तेज डाऊनलोड केलेल्यांच्या क्रमांकांना पैसे पाठवू शकता. 
 
तेजद्वारे युजर्सना पैसे कमावण्याचीही संधी
अॅप मित्रांना रेफर करावे लागेल. त्यांनी पहिला व्यवहार करताच दोघांच्याही खात्यात ५१ रुपये ट्रान्सफर. जास्तीत जास्त ५० रेफरल रिवॉर्ड््स प्राप्त करू शकता.
१००० रुपये जिंकण्याची संधी : गुगल सपोर्टनुसार ट्रान्झॅक्शनसोबत अॅपमध्ये एक स्क्रॅच कार्ड मिळेल. याच्या साहाय्याने तुम्ही १ हजारापर्यंत पैसे जिंकू शकता.
लकी संडेत १ लाख : दर आठवड्यात एक लाख रुपयांपर्यंत जिंकू शकता. दर रविवारी लकी संडे ऑफर असेल. यामध्ये एखादा व्यवहार विजेता बनू शकतो.
बातम्या आणखी आहेत...