आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिओ फीचर फोनच्या विरुद्ध Micromaxचा Bharat-1, 97 रुपयांत मिळणार 4जी डेटा व अनलिमीटेड कॉलिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिझनेस डेस्क - रिलायन्स जिओने मागील महिन्यात मोठ्या थाटात फीचर फोनचे लाँचिंग केले. या फीचर फोनशी स्पर्धा करण्यासाठी अनेक कंपन्यांनी तयारी सुरु केली होती. या स्पर्धेला तोंड देण्यासाठी मायक्रोमॅक्स या भारतीय कंपनीने भारतीय संचार निगम लिमीटेडच्या सहकार्याने भारत-1 या 4जी फोनचे लाँचिंग केले. 

लाँचिंगवेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 50 कोटी फोन यूजर्सच्या गरजा लक्षात ठेऊन हा फोन तयार करण्यात आला आहे. भारत-1 या फोनमुळे अनेक यूजर्सला बराच फायदा होणार आहे. हा फोन खरेदी केल्यावर बीएसएनएलच्या 97 रुपयांच्या प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा मिळणार आहे. भारतातील अनेक लोकं आजही इंटरनेटपासून दूरच आहेत. त्याच लोकांनी इंटरनेटशी जोडण्यासाठी हा फोन लॉंच करण्यात आला आहे.
 
हे आहेत स्पेसीफिकेशन
- 4जी सपोर्ट
- 2000 एमएएच बॅटरी
- QVGA display
- alphanumeric keypad
- WiFi and Bluetooth.
- 2MP rear snapper and a VGA camera
 
बातम्या आणखी आहेत...