गॅजेट डेस्क - जगप्रसिद्ध कोडॅकच्या नावाने स्मार्टफोन विक्रीचे लायसेन्स मिळवणारी कंपनी बुलइट ग्रुपने भारतात Kodak Ektra स्मार्टफोन लाँच केला आहे. फोनची किंमत 19,999 रुपये आहे. हा फोन खासकरून फोटोग्राफीसाठी डिझाइन करण्यात आला आहे. मंगळवारपासून Kodak Ektra फ्लिपकार्टवर उपलब्ध झाला आहे. हा फोन भारताशिवाय अमेरिका आणि युरोपातही अव्हेलेबल आहे. कोडॅक एक्ट्रा स्मार्टफोनला अमेरिकेच्या बुलइट ग्रुप कंपनीने बनवले आहे. या कंपनीने कोडॅककडून या स्मार्टफोनच्या विक्रीसाठी आपले ब्रँड नेम वापरण्याचा परवाना घेतला आहे.
सुपरडुपर कॅमेऱ्याचा फोन
- या फोनमध्ये आयएसओ, एफ/2.0 अपर्चर, ड्युएल एलईडी फ्लॅशसोबत 21 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आहे आणि PDAF व अपर्चर एफ/2.0 सोबत 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
याशिवाय, कॅमेरा अॅपमध्ये DSLR मोड उदा. स्मार्ट ऑटो, पोर्ट्रेट, मॅन्युअल, स्पोर्ट्स, नाइट-टाइम, एचडीआर, पॅनोरमा, मॅक्रो, लँडस्केप आणि 4k व्हिडिओ रेकॉर्डिंग यासारखे फीचर आहेत. याशिवाय अॅडव्हान्स्ड मॅन्युअल मोडही आहे. यामुळे युजर एक्स्पोजर, आयएसओ, फोकल लेंथ, व्हाइट बॅलेन्स, शटर स्पीड आणि अपर्चर अॅडजस्ट करू शकतात.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा या फोनचे आणखी काही फीचर्स अन् फोटोज...