आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याठिकाणी फ्री Wi-Fi वापरणे पडू शकते महाग, हे आहेत धोके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एअरपोर्ट अथवा रेल्वे स्टेशनवर फ्री वायफाय वापरणे खूप धोकादायक असते. याठिकाणी असलेल्या पब्लिक वायफायच्या वापराने तुमचे बँक खाते रिकामे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारी एजन्सी इंडियन काम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने इशारा जाहीर केला आहे. फ्री वायफाय वापरणाऱ्यांवर सायबर अटॅकचा धोका अधिक असतो. तुमच्या स्मार्टफोनसह लॅपटॉपवरही सायबर अटॅक होऊ शकतो.
 
वैयक्तिक माहितीची होऊ शकते चोरी
एजन्सीने सांगितले की, पब्लिक वायफाय वापरणाऱ्या लोकांच्या स्मार्टफोन अथवा लॅपटॉपमधून वैयक्तिक माहिती चोरी खूप लवकर करता येते. हॅकर तुमच्या क्रेडिट कार्डचा क्रमांक, पासवर्ड, चॅट मॅसेज आणि ई मेल अशी माहिती चोरू शकतो. 
 
अँड्रॉईड, विंडोज आणि ओएसपण नाही सुरक्षित 
रिसर्चर मॅथी वैनहोफने याला क्रॅक असे नाव दिले. या अंतर्गत हॅकर्स वायफायच्या माध्यमातून कोणत्याही डिव्हाईसमध्ये मालवेअर व्हायरस इन्स्टाल करू शकतो. त्यामुळे सुरक्षित समजले जाणारे ऑपरेटींग सिस्टीमसुद्धा यातून सुटले नाहीत.
 
पुढील स्लाईडवर वाचा - असा करा हॅकर्सपासून बचाव
 
 
बातम्या आणखी आहेत...