आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीच्या मुहूर्तावर 5G चा धमाका, वेगवान इंटरनेटची क्वालकॉम कंपनीची चाचणी यशस्वी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिझनेस डेस्क - स्मार्टफोनचा प्रोसेसर तयार करणाऱ्या क्वालॅकॉम या कंपनीने मंगळावारी पहिली 5G ची मोबाईलवर घेतली. त्यानंतर आता वेगवेगळ्या स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्या आणि नेटवर्क ऑपरेटर्समार्फत 5जीच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. गेल्यावर्षी कंपनीतर्फे 5Gच्या संशोधनाबाबत खुलासा करण्यात आला होता. त्यामुळे 2019च्या सुरुवातीला 5जीचा स्मार्टफोन ग्राहकांच्या हातात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 
 
क्वालकॉमचे उपकार्यकारी अध्यक्ष क्रिस्टीनो अमॉन म्हणाले की, आम्ही 5Gची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. यामुळे नक्कीच इंटरनेटची स्पीड आणखी वाढेल. त्यामुळे स्मार्टफोन युजर्सला अधिक चांगला अनुभव घेता येणार आहे.  
 
- मागील वर्षी कंपनीने 5Gच्या संशोधनाबाबत घोषणा केली होती.
- 17 ऑक्टोबर 2017 ला कंपनीने पहिली 5Gची चाचणी पूर्ण केली.
- या चाचणीमुळे 5G नेटवर्क वापरणे सुकर होणार आहे.
- स्मार्टफोन उत्पादक आणि नेटवर्क ऑपरेटरच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर 2019पर्यंत 5G स्पीड असलेला मोबाईल ग्राहकांच्या हातात असेल. 
 
बातम्या आणखी आहेत...