आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा असेल Jio चा 500 रुपयांचा 4G फोन, समोर आले नवे फोटोज आणि फीचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - मीडिया रिपोर्टनुसार 21 जुलैला जियो 500 रुपयांचा 4G फीचर फोन लाँच करणार आहे. या फोनचे नवे फोटोज समोर आले आहेत. हे फोटोज TechPP आणि Telecom Talk वेबसाइट्सवर लीक झाले आहेत. लाँचिंगच्या बातम्यांसोबतच हे फोटो समोर आल्याने फोनबाबत तो खरा असल्याचे मानले जात आहे. फोटोमध्ये फोनवर LYF ब्रँडचा लोगो दिसून येत आहे. फ्रंटमध्ये टॉर्च लाइटचा आयकॉन आहे. वर मेन्यू आणि बॅक बटण तसेच डावीकडे व उजवीकडे फोन रिसिव्ह करण्यासाठी आणि बंद करण्याचे ऑप्शन दिसून येत आहे.
 
फोनवर कंपनी देणार मोठे डिस्काउंट
- हा फोटो लीक झालेल्या जुन्या फोटोहून वेगळा आहे. जुन्या फोटोमध्ये जियोच्या अॅप्सच्या ऑयकॉनला स्पॉट करण्यात आले होते. यात असे काहीच दिसून येत नाही. तज्ज्ञ म्हणतात की, 500 रुपयांत कोणताही 4G फोन येऊ शकत नाही. कंपनी या फोनवर तब्बल 975 रुपयांची सूट देईल. याची किंमत 1500 रुपयांच्या आसपास असेल. सूट दिल्याने हा फोन 500 रुपयांत उपलब्ध होऊ शकतो.
 
 
म्हणून येताहेत अशा बातम्या...
- खूप दिवसांपासून या फोनची चर्चा होत आहे. 21 जुलैला रिलायन्स जिओची वार्षिक बैठक होणार आहे. या निमित्तानेच या फोनला लाँच केले जाऊ शकते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार हा 4G फोन 15 ऑगस्ट रोजीही लाँच होऊ शकतो.
 
कंपनीने हे म्हटले...
जेव्हा नव्या लीक झालेल्या फोटोबाबत आम्ही जियोच्या प्रवक्त्यांशी संपर्क साधला, तेव्हा ते म्हणाले की, सध्या कंपनीने या फोनबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
 
पुढच्या स्लाइडमध्ये पाहा फोनचे नवे फीचर्स...
बातम्या आणखी आहेत...