आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 4G नाही तर 'स्मार्ट 4G फीचर फोन' आहे Jioचा, हे आहेत TOP फीचर्स...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - रिलायन्स जिओने आपल्या 4G फीचर फोनचा सस्पेन्स संपवून तो लाँच केला आहे. कंपनीने आपल्या 40 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (AGM)मध्ये लाँच केला. या फोनला स्मार्ट 4G फीचर फोन म्हटले जात आहे. कंपनी हा फोन युजर्सना फ्रीमध्ये देणार आहे. तथापि, सुरुवातीला यासाठी सुरक्षा ठेव म्हणून 1500 रुपये जमा करावे लागतील. जे 3 वर्षांनंतर युजरला रिफंड केले जातील. 
कंपनीच्या प्रवक्त्यांनी divyamarathi.com ला सांगितले की या फोनचे अनेक डिव्हाइस व्हेंडर्सनी मिळून बनवले आहेत. परंतु त्यांना Jiophone चे नाव देण्यात आले आहे. याला जिओची स्मार्टफोन कंपनी LYFचा सपोर्ट मिळेल. हा फीचर फोन एखाद्या स्मार्टफोनप्रमाणेच आहे. युजरच्या व्हॉइस कमांडवर काम करतो. दुसरीकडे NFC सारख्या फीचरच्या मदतीने सिंगल टॅपने पेमेंटही करता येईल. हा फोन हायटेक फीचर्सने युक्त आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, जिओच्या स्मार्ट 4G फीचर फोनचे स्पेसिफिकेशन...
बातम्या आणखी आहेत...