आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅट, कॉलिंगच नाही whatsapp वर पैसेही होतील ट्रान्सफर, मिळाली परमिशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - लवकरच WhatsApp वरून तुम्ही पैसेही ट्रान्सफर करू शकाल. इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपला पेमेंट सर्व्हिस मनी ट्रान्सफरसाठी भारत सरकारच्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)ने मंजुरी दिली आहे.
-व्हॉट्सअॅपला डिजिटल पेमेंटसाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)कडून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI)च्या वापराची परमिशन मिळाली आहे. यूपीआयच्या मदतीने एका अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंटवर मोबाइल अॅपच्या मदतीने सहज पैसे ट्रान्सफर होतील. काही दिवसांआधी व्हॉट्सअॅपने मनी ट्रान्सफर सर्व्हिससाठी एसबीआय, पंजाब नॅशनल बँक आणि अॅक्सिस बँकेशी बोलणी केली आहे.
 
अनेक बँकांशी होऊ शकेल पार्टनरशिप
- आता व्हॉट्सअॅपची अनेक बँकांशी पार्टनरशिप होऊ शकेल. याचा सर्वात मोठा फायदा व्हॉट्सअॅप युजर्सना मिळेल. ज्या तऱ्हेने या अॅपवर सहज मेसेजेस पाठवता येतात त्याच पद्धतीने पैसेही सहज ट्रान्सफर होतील.
- यासाठी बँक अकाउंट नंबर वा आयएफएससी कोड टाकण्याची गरज राहणार नाही. पैशांची देवाणघेवाण फक्त मोबाइल नंबर वा व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस म्हणजेच व्हीपीएद्वारे होईल.
 
पुढच्या स्लाइडवर पाहा, पेमेंट ट्रान्सफरसंबंधी आणखी माहिती...
बातम्या आणखी आहेत...