Home »Business »Gadget» Teacher Makes 15 Educational App From Pune

इंजिनीअर नसूनही पुण्यातील या व्यक्तीने तयार केले 15 अॅप, मायक्रोसॉफ्ट कंपनीनेही केले कौतुक

औरंगाबाद - तुमच्याकडे नव्या आयडियांसह जिद्द असेल, तर तुम्हाला कोणतीही परिस्थिती तुम्हाला बदल घडविण्यापासून रोखू शकत नाही

दिव्य मराठी वेब टीम | Oct 09, 2017, 11:55 AM IST

औरंगाबाद -तुमच्याकडे नव्या आयडियांसह जिद्द असेल, तर तुम्हाला कोणतीही परिस्थिती तुम्हाला बदल घडविण्यापासून रोखू शकत नाही. हे सिद्ध केले आहे जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या एका शिक्षकाने. या शिक्षकाला सॉफ्टवेअर इंजिनीअर व्हायचे होते. मात्र नशिबात काहीतरी वेगळेच लिहिलेले होते. इंजिनीअर न होतो ते जिल्हा परिषद शाळेत 2004 साली रुजू झाले. इंटरनेट सर्फिंगने ते कायम जगाच्या संपर्कात होते. यादरम्यान त्यांना त्यांच्यातील अभियंता कायम जिवंत ठेवला. संधी मिळाली अन् त्यांनी संधीचे सोने केले. आज या शिक्षकाची दखल संगणक क्षेत्रातील मायक्रोसॉफ्ट कंपनीने घेऊन इनोव्हेटर एज्युकेटर म्हणून गौरव केला आहे. होय, हे शिक्षक आहेत मूळ सोलापूरचे सध्या पुण्यातील जांभूळदरा भाम येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असलेले 34 वर्षाचे नागनाथ विभूते.. 
 
दिव्य मराठी वेब टीमशी बोलतांना नागनाथ विभूते म्हणाले, की मी पेशाने शिक्षक असलो तरी मनातील अभियंता कायम जिवंत होता. त्यामुळे इंटरनेट सर्फिंगच्या माध्यमातून कायम जगाच्या संपर्कात असायचो. जगभरात घडणाऱ्या नव्या घडामोडींचा दररोज आढावा घ्यायचो. 2004 साली मी बुलढाण्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालो. त्यानंतर माझी बदली पुण्यातील जांभूळदरा येथे झाली. येथे आल्यावर मला नव्या प्रयोगाची संधी मिळाली. या तंत्रज्ञानाच्या प्रयोगाला ग्रामस्थ, वरिष्ठ आणि सहकाऱ्यांनीही मला सहकार्य केले. त्या जोरावर शाळेला आधुनिक रुप देणे, अँड्राईड अॅप्लिकेशन तयार करणे आणि व्हर्च्युअल टूर विद्यार्थ्यांना घडवून आणता आला. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - ऑस्टेलिया, वॉशिंग्टनमध्ये देतात मराठीचे व्हर्च्युअल धडे

Next Article

Recommended