आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान.. SIM व्हेरिफिकेशनच्या नावाखाली ग्राहकांची कंपन्यांकडून केली जातेय फसवणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सध्या असलेले मोबाईल ग्राहकांचे मोबाईल व्हेरिफिकेशन फेब्रुवारी 2018 पर्यंत करण्याचे आदेश केंद्राने टेलिकॉम कंपन्यांना देण्यात आलेले आहेत. ज्या ग्राहकांनी मोबाईल व्हेरिफिकेशन केले नसेल, असे मोबाईल क्रमांक बंद केले जाणार आहेत. ग्राहकांच्या या मजबूरीचा फायदा काही टेलिकॉम कंपन्या उचलत आहेत. यासंदर्भात ग्राहकांकडून युनिक आयडेन्टिफिकेशन ऑथरीटी ऑफ इंडियाला मिळालेल्या आहेत. त्यानंतर युआयडीएआयने संबंधित कंपन्यांना यासंदर्भात् सुचना केलेल्या आहेत. त्याचबरोबर या चुकीच्या गोष्टी थांबवा, अन्यथा दंड भरण्यास सज्ज राहा, असेही बजावण्यात आले आहे.
 
हे आहे प्रकरण
 
फेब्रुवारी 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांचे मोबाईल व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक आहे. अन्यथा मोबाईल क्रमांक बंद केला जाणार आहे. त्यानंतर कंपन्यांनी व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुरु केली. याचा गैरफायदा घेत कंपन्यांनी चुकीची कामे सुरु केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
 
अशा आहेत तक्रारी
 
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काही टेलिकॉम कंपन्या व्हेरिफिकेशनच्या नावाखाली पेमेंट बँकांचेही खाते उघडून घेत आहे. त्यासाठी ग्राहकांचे दोन ते तीन वेळा बायोमेट्रीक केले जात आहे. इतकेच नव्हे तर व्हेरिफिकेशनसाठी कंपन्या दोन ते तीन अर्ज भरून घेत आहेत.
 
अन्यथा भरावा लागेल दंड
 
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात कंपन्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तक्रारीच्या आधारे कंपन्यांची उलट तपासण्याही करण्यात येत आहेत. युआयडीएआयने स्पष्ट सूचना दिल्या की, जर ग्राहकांना त्रास दिला तर कारवाईला सामोरे जावे लागेल. जर एखाद्या तक्रारीत कंपनी दोषी असल्यास एक कोटी रुपयांपर्यंत दंड वसूल केला जाईल.
 
टेलिकॉम कंपनीला एवढीच द्या माहिती
 
- मोबाईल युजर आपल्या कंपनीच्या शोरुममध्ये जाऊन व्हेरिफिकेशन करू शकतो. मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असल्यास बायोमेट्रीक माहिती देण्याची आवश्यकता नाही.
 
- जर वापरत असलेला मोबाईल क्रमांक आधारशी लिंक नसेल, तरच तुम्हाला बायोमेट्रीक माहिती देणे गरजेचे आहे. 
बातम्या आणखी आहेत...