आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत डिजीटल मार्केटिंगमधील रोजगाराच्या संधी, कमवा 40 लाख रुपयांपर्यंत पगार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिझनेस डेस्क - देशभरात शहरी आणि ग्रामीण क्षेत्रात इंटरनेटच्या विस्ताराने कंपन्यांना जाहिरातीसाठी एक उत्तम व्यासपीठ मिळाले आहे. जिथे एका बाजूने डिजिटल जाहिरातबाजी वेगाने वाढते आहे, तिथे यावर केला जाणारा खर्च गेल्या काही वर्षांत वाढला आहे. डिजिटल माध्यमांचा विस्तार आणि इंटरनेट ग्राहकांची संख्या वाढल्याने डिजिटल मार्केटिंगला प्रोत्साहनच मिळाले आहे. यामुळे युवकांसाठी नोकरीच्या संधीही वाढल्या आहेत.
 
गेल्या काही वर्षांत डिजिटल मार्केटिंग देशात मार्केटिंगचा एक महत्त्वाचा भाग होऊन उदयास आला आहे. 2010 च्या पूर्वीपर्यंत डिजिटल माध्यमांना एवढ्या गांभीर्याने घेतले जात नव्हते. पण देशभरात इंटरनेट ग्राहक आणि तांत्रिक विकासामुळे डिजिटल मार्केटिंगला महत्त्वपूर्ण मानले जाऊ लागले आहे. वर्तमानात डिजिटल मार्केटिंगच्या विस्ताराने युवकांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. अहवालानुसार डिजिटल मार्केटिंग या वर्षीच्या अखेरीस 8 लाख लोकांसाठी रोजगाराचे माध्यम होईल.
 
पुढील स्लाईडवर वाचा - पाच वर्षात डिजीटल जाहिरातीत झाली 33 टक्के वाढ 
 
बातम्या आणखी आहेत...