आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही तासांतच तयार होतो iphone, फॅक्टरी वर्कर्स असा व्यक्त करतात आपला संताप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅपल, सॅमसंग, सोनीसारख्या कंपन्यांचे जागतिक बाजारपेठेत मोठे नाव आहे. शानदार डिझाइन, फीचर्स आणि सॉफ्टवेयरमुळे या कंपन्यांचे स्मार्टफोन युजर्सचे लक्ष चटकण वेधून घेतात. मात्र, आपल्याला माहीत आहे का? या सर्व कंपन्यांचे स्मार्टफोन एकाच ठिकाणी तयार होतात. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, परंतु हे सत्य आहे.
'फॉक्सकॉन' फॅक्टरीत अॅपल, सॅमसंग आणि सोनी सारख्या अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोनची एकाच वेळी निर्मिती केली जाते. उल्लेखनिय म्हणजे या फॅक्टरीतील कर्मचार्‍यांना आपला राग व्यक्त करण्‍याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. ते हटके अंदाजात आपला राग व्यक्त करतात.
'फॉक्सकॉन' फॅक्‍टरी चीनमधील शेनजेन शहरात आहे. येथे स्मार्टफोनसह डेल आणि एचपी कंपन्यांच्या प्रॉडक्टचीही निर्मिती केली जाते. फॉक्सकॉन कंपनीत सुमारे तीन लाख कर्मचारी काम करतात. एखाद्या शहराच्या लोकसंख्येच्या बरोबरीने फॉक्सकॉन कंपनीची लोकसंख्या आहे. फ्लोरिडामधील ऑरलॅंडो शहराची एकून लोकसंख्या तीन लाखांपेक्षा कमी आहे. फॉक्सकॉन फॅक्टरीत दिवस आणि रात्र अशा दोन शिफ्टमध्ये काम चालते.
काही तासांतच तयार होतो iphone
'फॉक्सकॉन'चे वर्कर्स क्वालिटी वर्क करतात. येथे स्मार्टफोनसह आयपॅड, आयफोन्स, मॅकबुक आणि अॅपलचे सर्व प्रॉडक्ट्‍सची निर्मिती होते. सर्व वर्कर्स शांत डोक्याने काम करतात. वेगवेगळे पार्ट्‍स जोडून आयफोनचा सिंगल सेट तयार करण्‍यासाठी 24 तासांपेक्षा कमी कालावधी लागतो. त्यापैकी 6-8 तास सॉफ्टवेयर इन्स्टॉल करण्‍यासाठी लागतात.

वर्कर्सला क‍िती मिळते सॅलरी...
'फॉक्सकॉन' फॅक्टरीतील वर्करला 285 डॉलर्स अर्थात 17,774 रुपये मा‍सिक पगार मिळतो. 80-80 तासांचा ओव्हरटाइम देखील करावा लागतो. याच कारणामुळे येथील अनेक कर्मचारी आत्महत्या करतात. यावर उपाययोजना म्हणून बिल्डिंगखाली जाळी लावण्यात आली आहे.
वर्कर्स पुतळ्यांवर काढतात आपला राग...
'फॉक्सकॉम'मध्ये काम करणार्‍या प्रत्येक वर्करला आपला राग व्यक्त करण्‍याची सुविधा दिली जाते. एखादा वर्कर संतापला असेल तर त्याला आपला राग व्यक्त करण्‍यासाठी पुतळे ठेवण्यात वाले आहे. पुतळ्याला मारहाण करून वर्कर्स आपला राग काढतात. विशेष म्हणजे वर्करला कोणावर राग काढायचा आहे. त्याच्या चेहर्‍याचे प्रिंट आउट काढून पुतळ्यांवर चिटकवले जाते. नंतर वर्कर बेसबॉलच्या बॅट अथवा लाथाबुक्क्यांनी पुतळ्याची इथेच्छ धुलाई करातात.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, 'फॉक्सकॉन' फॅक्टरीतील Photo...