आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आभासी वास्तविकेतचा धूसर भूतकाळ आणि भविष्यही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्सचा कलावंत पॉल डोमिनिक फिलिपॉटिओक्स याने गेटिसबर्ग पेंटिंगचा (सायक्लोरेमा) पहिला प्रयोग केला होता. या महाकाय गोलाकार पेंटिंगमध्ये गेटिसबर्गच्या युद्धप्रसंगांचे चित्रण होते. २२ फूट उंच आणि २७९ फूट व्यासाच्या या पेंटिंगमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी त्याच्या आजूबाजूला पडलेली झाडे आणि काटेरी झुडुपे ठेवण्यात आली होती. गेटिसबर्ग सायक्लोरेमा ही अशाप्रकारची पहिली कलाकृती नव्हतीच मुळी. सन १८००च्या अखेरीस लोक सायक्लोरेमाच्या प्रेमात पडले होते. प्रत्यक्षापेक्षा खुल्या डोळ्यांनी स्वप्ने बघण्याच्या मानवाच्या स्थायी महत्त्वाकांक्षेची ती अभिव्यक्ती होती. अाम्ही या जुन्या कल्पनेला कल्पक वास्तव (व्हर्च्युअल रिअॅलिटी) असे नाव दिले आहे. नवनवे तंत्रज्ञानाचे आविष्कार बाजारात उपलब्ध झाल्याने या कलेला जणू नवा जन्म मिळाला आहे. २८ मार्चपासून ओक्युलस रिफ्ट आणि एप्रिलपासून एचटीसी वाइव्हची विक्री सुरू झाली आहे. सोनीचे व्हर्चुअल रिअॅलिटी प्ले स्टेशन यंदाच बाजारात येत आहे.
व्हर्चुअल रिअॅलिटीच्या क्षेत्रात झालेले बहुतेक प्रयत्न वाया गेले आहेत. ते अमूल्य होते, पण फारशा गांभीर्याने घेतलेच गेले नाहीत. आता कुणीही पॅनोरमा किंवा सायक्लोरेमा बनवण्याच्या भानगडीत पडत नाही. दोन इमेजेसच्या माध्यमातून खोलीचा आभास देणारा स्टिरिओस्कोप लुप्त झाला आहे. खरं म्हणजे, मेटल कंपनीच्या व्ह्यू मास्टरने त्याला बराच काळपर्यंत जिवंत ठेवले होते. १९६२ मध्ये शोध लागलेला सेन्सोरेमादेखील फार प्रभाव पाडू शकला नाही. त्याच्यात थ्री-डी व्हिडिओ, स्टिरिओ साउंड, हवा आणि सुगंधांचा समावेश होता. अशा प्रकारच्या डिव्हाइसना सर्वाधिक लोकप्रियता आयमॅॅक्सच्या रूपात मिळाली आहे. जगात सुमारे १,००० ठिकाणी आयमॅक्स सुरू आहेत.
व्हर्चुअल रिअॅलिटीच्या प्रयत्नांचा असा अंत का झाला? ओक्यूलस आणि वाइव्हचीही तीच गत होणार की काय? प्रचंड खर्च हेही एक कारण आहे. रिफ्ट आणि वाइव्हचे सिस्टीम खूप अवजड असल्याची लोकांची तक्रार आहे. कंटेंटचा अभाव असणे, ही आणखी एक समस्या आहे. नव्या माध्यमाशी जुळण्यासाठी प्रतिभावंत लोकांचा शोध खूप कठीण आहे. मानवी चेतना पुचकारणे आणि नियंत्रित करणे यासाठी आवश्यक हार्डवेअर खूपच गुंतागुंतीचे आहे. १९६८ मध्ये मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी डोक्यावर लागणारे एक उपकरण बनवले होते. पण ते वजनाने इतके जड होते की, त्याला वापरणाऱ्याच्या डोक्यावरील छतावर अडकवावे लागायचे.
वाइव्ह आणि ओक्युलस इतके ओंगळ तर नाहीत, पण तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्षही करू शकणार नाही. दोन्ही हँडसेट्सचे वजन जवळपास अर्धा किलो आहे. नाकावर ते जाणवते. चेहेऱ्यावर निशाण उमटते. जेव्हा आपण व्हर्चुअल रिअॅलिटीच्या जगात प्रवेश करतो, तेव्हा वास्तविक जगातील आपल्या शरीराचे आपल्याला भान राहत नाही. कंटेंटच्या समस्येवर मात्र उपाय शोधण्यात आला आहे. गेम डेव्हलपर आणि हॉलिवूडची त्यासाठी मदत घेतली जात आहे. दोघांचाही कंटेंट स्वस्त नाही. ओक्यूलसचा ३९,००० रुपयांचा आहे आणि वाइव्हचा ५२,००० रुपयांचा आहे. हे डिव्हाइस चालवण्यासाठी प्रती सेकंद ९० फ्रेम्सची गती असणाऱ्या शक्तिशाली संगणकाची आवश्यकता असणार आहे.