आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 MP ऑटोफोकस कॅमेरा असलेला इंटेक्सचा हायटेक फोन लाँच, किंमत 9590 रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅझेट डेस्क: भारतीय स्मार्टफोन कंपनी इंटेक्सने (Intex) आता, एक्वा सीरीजचा एक नवीन स्मार्टफोन Xtreme 2 बाजारात आणला आहे. इंटेक्सने या फोनची किंमत 9,590 रुपये एवढी ठेवली आहे. हा फोन चाहत्यांना ऑनलाइन शॉपिंगच्या सहाय्याने देखील विकत घेता येऊ शकतो. कंपनीने यात ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 16GB इंटरनल मेमरी दिली आहे.
इंटेक्स अॅक्वा 'Xtreme 2' मधील फीचर्स
कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 5 इंच IPS स्क्रीन दिली आहे, जी HD (720 x 1280 पिक्सेल रेझोल्यूशन) डिस्प्लेला सपोर्ट करते. युजरला चांगली स्पीड मिळावी म्हणून यात 1.4GHz ऑक्टा-कोर मेडियाटेक MT6592M प्रोसेसर आणि 2GB रॅम देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या कीटकॅट व्हर्जन 4.4.2 या ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. फोनची इंटरनल मेमरी 16GB एवढी आहे, जी मायक्रो SD कार्डच्या मदतीने 32GB पर्यंत वाढवली जाऊ शकते.
इंटेक्स अॅक्वा एक्सट्रीम 2 मध्ये 13 मेगापिक्सेलचा ऑटोफोकस रियर कॅमेरा LED फ्लॅश सह देण्यात आला आहे. हा कॅमेरा फुल HD व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा असून यात सीन डिटेक्शन, पॅनोरमा, जीओ-टॅगिंग, बेस्ट शॉट, HDR, फेस रिकग्नायझेशन यासारखे कॅमेरा फीचर्स देखील दिले आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा, इंटेक्स अॅक्वा Xtreme 2 चे आणखी काही खास फीचर्स