Apple कंपनीने
आपले iPhone 6S व 6S Plus हे दोन लेटेस्ट स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. यासोबत कंपनीने ग्राहकांसाठी खूशखबर दिली आहे. ती म्हणजे, कंपनीने या लॉन्चिंगनंतर आपल्या आधीच्या तीन हँडसेट्सच्या किमतीत मोठी कपात केल्याची घोषणा केली आहे. iPhone 5S, iPhone 6 व iPhone 6 Plus चा त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे तिन्ही हँडसेट्स कंपनीने आपल्या वेबसाइटवर लिस्ट देखील केले आहेत.
Apple ने तिन्ही स्मार्टफोन्सचे गोल्ड कलर व्हेरिएंट्सला साइटवरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की, तिन्ही हँडसेट्स आता फक्त सिल्व्हर व स्पेस ग्रे कलरमध्ये उपलब्ध होणार आहेत.
कंपनीने iPhone 5S, iPhone 6 व iPhone 6 Plus या तिन्ही हँडसेटच्या किमतीत 100 डॉलर्सनी (जवळपास 6317 रुपये) कपात केली आहे. भारताशिवाय अनेक देशाती ही कंपनी आपले हँडसेट्स कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर विक्री करते. यापूर्वी तिन्ही हँडसेट्सवर दोन वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टवर (प्रति हँडसेट) 199 डॉलर (जवळपास 12571 रुपये) आकारत होती. मात्र, त्यात कपात करण्यात आली असून आता युजर्सकडून दोन वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टवर (प्रति हँडसेट) 100 डॉलर (जवळपास 6317 रुपये आकारले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
रीटेल स्टोअर्सवर हे तिन्ही हँडसेट कधी उपलब्ध होतील, या संदर्भात कंपनीने कोणताही खुलासा केला नाही.