आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPhone 6S Images Leak On 9to5mac, It Will Be More Stylish.

iphone 6S चे कन्सेप्ट डिझाइन झाले लीक, आधीपेक्षाही आहे स्टायलिश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Apple कंपनी आपला बहुप्रतिक्षीत iphone 6S च्या लॉन्चिंगची तयारी करत आहे. दुसरीकडे मात्र, या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स लीक होत आहे. आता वेबसाइट 9to5mac.com ने iphone 6Sच्या कन्सेप्ट डिझाइनचे फोटो लीक केले आहे. यापूर्वी iphone चे फीचर्स लीक झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, iphone 6S चा लूक iphone 6 आणि 6+ सारखाच आहे. मात्र, कंपनीने यात अनेक इंटरनल चेंजेज केल्याची माहिती मिळाली आहे. Apple कंपनीच्या एका सोर्सने iphoneशी संबंधित माहिती आणि फोटो शेअर केल्याचा दावा 9to5mac.com ने केला आहे. परंतु, Appleच्या नव्या मॉडेलच्या नावाचा खुलासा या सोर्सने केलेला नाही. iphone 6S किंवा iphone 7 असू शकतो.

iphone च्या Upcoming Model मध्ये असू शकतात ही खास वैशिष्ट्ये...
* Apple चा आगामी iphone ग्रे कलर मध्ये लॉन्च होईल. बॉडी डायमेंशन iphone 6 सारखेच असेल.
* iphone 6S च्या फ्रेममध्ये काही बदल करण्‍यात आले आहेत. लॉजिक बोर्डची पोजिशन देखील बदलण्यात आली आहे.
* सेंसर स्पीकर आणि मायक्रोफोनच्या जागेत कोणताही बदल करण्यात अालेला नाही.
* iphoneमध्ये होम बटन नसेल अशी यापूर्वी चर्चा सुरु होती. परंतु लीक झालेल्या फोटोमध्ये iphone ला होम बटन दिसत आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, वेबसाइट 9to5mac ने लीक केलेले iphoneचे फोटो...