आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात सर्व फोनमध्ये आयरिस तंत्रज्ञान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी सरकार देशात रेटिना स्कॅनिंग फोनच्या वापराला अधिक गती देण्याची तयारी करत आहे. यामुळे तुमच्या डोळ्यांना स्कॅन करून फोन लॉक आणि अनलॉक होणार आहे. सध्या वापरण्यात येणार्‍या बायोमेट्रिक अॉथेंटिकेशन मॉडेलला पर्याय म्हणून या तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे सरकारचे मत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर देशात वापरण्यात येणार्‍या सर्व मोबाइलमध्ये करावा, असे नियोजन करण्याचा सरकारचा विचार आहे. सरकारी योजनांना सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी याचा वापर करण्याचा सरकारचा विचार आहे. यामुळे सरकारी योजना लवकर आणि पारदर्शक पद्धतीने सर्वांपर्यंत पोहोचतील.

किमती वाढणार
सर्व मोबाइल फोनमध्ये आयरिस तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य करण्यात आला, तर मोबाइल फोनच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात या पद्धतीच्या स्कॅनची किमती ३००० ते ३५०० रुपये आहे. जर हे तंत्रज्ञान फोनमध्ये वापरले तर फोनच्या किमती वाढतील. त्यामुळे सरकार मोबाइल उत्पादकांशी चर्चा करून सबसिडी देण्याची तयारी करू शकते.

योजनेच्या खोट्या लाभार्थींना चाप
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार देशात विकल्या जाणार्‍या सर्व मोबाइल फोनमध्ये ही सुविधा देण्याचा विचार करत आहे. यामुळे सर्व नागरिकांचे बायोमेट्रिक अॉथेंटिकेशन करण्यास मदत मिळेल. त्यामुळे सरकारी योजना सरळ योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचण्यास मदत मिळेल. ज्याप्रमाणे आधार कार्डसाठी डोळ्यांचे स्कॅनिंग करण्यात आले, ते तंत्रज्ञान फोनवर वापरले जाऊ शकते. त्यामुळे सरकारी योजनांमधील खोट्या लाभधारकांना चाप बसेल. तसेच कॅश सबसिडी योग्य व्यक्तीच्या खात्यात जमा होण्यास मदत मिळेल.

सरकारचे प्रयत्न सुरू
हे तंत्रज्ञान वापरले जावे आणि त्याचा अधिक प्रचार व्हावा यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि रेटिना स्कॅनिंग सुविधा देणार्‍या कंपन्यांच्या अधिकार्‍यांमध्ये नुकतीच बैठक झाली. ही योजना लागू झाली तर आयरिस तंत्रज्ञानाचा सर्व फोनमध्ये वापर होणारा भारत जगातील पहिला देश ठरेल.
बातम्या आणखी आहेत...