Home »Business »Gadget» JioMoney Offer: Get Rs. 50 Cashback On Every Jio Payment

Jio ने केला नवा धमाका, आता फ्रीमध्ये अॅक्टिव्ह करु शकता प्राइम मेंबरशिप

दिव्य मराठी वेब टीम | Mar 19, 2017, 12:31 PM IST

तुम्ही रिलायन्स जियो यूजर्स आहात आणि अजूनही प्राइम मेंबरशिप घेतली नसेल, तर तुम्हाला हे फ्री मिळू शकते. जियोने मेंबरशिपसाठी 99 रुपये किंमत ठरवली आहे. या मेंबरशिपमध्ये हॅपी न्यू ईयर ऑफर मार्च 2018 पर्यंत अॅक्टिव्ह ठेवण्याची वॅलिडिटी मिळते. आता JioMoney च्या स्पेशल ऑफरमध्ये प्राइम मेंबरशिप फ्रि मिळू शकते.ही आहे JioMoney ची ऑफर...

JioMoney ने आपली ही ऑफर सोशल मीडियावर प्रमोट केली आहे. 5 फोटोंच्या मदतीने ही ऑफर समजवण्यात आली आहे. या फोटोमध्ये सांगितले आहे की, यूजरला प्रत्येक जियो रिचार्जवर 50 रुपययांचे कॅशबॅक ऑफर मिळेल. म्हणजेच मेंबरशिप प्लान आणि 303 रुपयांच्या टॅरिफने वरील सर्व रिचार्जवर 50 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

अशी मिळेल फ्री प्राइम मेंबरशिप
जर एखादा यूजर JioMoney अॅपच्या मदतीने प्राइम मेंबरशिप घेत असेल तर त्याला हे पुर्ण फ्री मिळू शकते. या प्राइम मेंबरशिपसाठी त्याला अगोदर 99 रुपयांचे रिचार्ज आणि 303 रुपये मंथली टॅरिफ रिचार्ज करावे लागेल. अशा प्रकारे यूजर 402 रुपये (99 रुपये+303 रुपये) खर्च करेल. ज्यावर 100 रुपयांचे कॅशबॅक मिळेल. म्हणजेच प्राइम मेंबरशिप रिचार्जचे पैसे परत मिळतील.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा JioMoneyची ऑफर प्रमोट केलेले फोटोज...

Next Article

Recommended