आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jio Phone ची बुकिंग आज संध्याकाळी 5 पासून! प्रश्नोत्तरातून जाणून घ्या फोनविषयी सर्वकाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- देशातील सर्वात स्वस्त 4G फीचर फोन रिलायन्स JioPhone ची प्री-बुकिंग गुरूवारी संध्याकाळी 5 वाजेपासून सुरू होत आहे. “पहले आओ, पहले पाओ” या पध्दतिने हा देण्यात येणार आहे. यासाठी कंपनीने ऑगस्टपासूनच सब्सक्रिपशन सुरू केले आहे. तीन वर्षाच्या रिफंडेबल प्लॅनच्या आधारे 1500 रुपयांत देण्यात येणाऱ्या या फोनची बुकिंग करताना 500 रुपये जमा करावे लागणार आहेत, तर बाकी 1000 रुपये हे डिलिवरीच्या वेळी द्यावे लागतील. सप्टेंबरच्या सुरूवातीपासून हा फोन युजर्सपर्यंत पोहोचण्यास सुरूवात होईल. रिलायंन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी गेल्या महिन्यात 22 जुलैला या फोनच्या लॉन्चिंगची घोषणा केली होती. 

जेव्हा अंबानी म्हणाले, या फीचर फोनने मला आश्यर्यचकित केले...
- मुकेश अंबानी या फोनची लाँचिंग करताना म्हणाले होते की, भारतात 78 कोटी मोबाईल फोन आहे. यात 50 कोटींपेक्षा अधिक लोक फीचर फोन वापरतात. डाटा चार्च आणि स्मार्टफोनचा खर्च त्यांना परवडत नाही. त्यांची ही अडचण दुर करण्यासाठी Jio फोन मदत करेल.
- मी Jio च्या तरूण इंजिनिअर्संना याचा भारतीय पर्याय शोधून काढण्यास सांगितले होते. त्यांनी जे संशोधन केले, त्याने मला आश्चर्यचकित केले आहे. आज Jio कन्व्हेन्शल फीचर फोनला एका डिव्हाइस फोनमध्ये बदलत आहे. हा फोन By Indians, For Indians आहे.  

प्रश्नोत्तरातून जाणून घ्या फोन बुकिंंगची पुर्ण प्रोसेस...

प्रश्न: फोनच्या प्रि-बुकिंगसाठी काय करावे लागेल?
उत्तर:
तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतिने फोनची बुकिंग करू शकता. ऑफलाइन बुकिंगसाठी Jio रिटेलर्स आणि रिलायन्स डिजिटल स्टोअर्समध्ये जाऊन फोन बुक करता येऊ शकेल, तर कंपनीचे अॅप MyJio आणि वेबसाइट jio.com वरून ऑनलाईन बुकिंग करता येऊ शकते.

प्रश्न: प्री- बुकिंगच्या वेळी किती पैसै जमा करावे लागतील?
उत्तर:
Jio फोनची प्री-बुकिंग करताना तुम्हाला फक्त 500 रूपये जमा करावे लागतील. उर्वरीत 1 हजार रूपये डिलिवरीच्या वेळी तुम्हाला द्यावे लागतील. तीन वर्षांनंतर तुम्ही ही रक्कम कंपनीकडून परत घेऊ शकता. ही रक्कम फोन जमा केल्यावरच परत मिळेल.

प्रश्न: फोन बुकिंगसाठी कोणते कागदपत्र लागतील?
उत्तर:
Jio फोन बुक करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि एक फोटो द्यावा लागेल. आधार कार्डशिवाय Jio फोन मिळणार नाही. फक्त आधार कार्ड नंबरवरूनही तुम्ही फोन बुक करू शकणार आहात. त्याची झेरॉक्स सोबत जोडण्याची गरज नाही.

प्रश्न: एकावेळी किती फोन बुक करता येऊ शकतात? 
उत्तर:
एका आयडीवरून 5 ते 6 फोन बुक करता येऊ शकतील. तुम्ही Jio च्या वेबसाइटवर जाऊन बिजनेस कॅटॅगरीमध्ये बल्कमध्येही फोन बुक करू शकता. ही सुविधा व्यावसाय करणाऱ्या छोट्या कंपन्यांना समोर ठेऊन देण्यात आली आहे.

प्रश्न: Jio फोनसोबत काय मिळेल?
उत्तर:
Jio फोनसोबत मेसेजिंग, एंटरटेंमेन्ट आणि इतरही अनेक अॅप्स प्री-लोडेड असतील. Jio टीव्ही अॅपमध्ये 400 चॅनल्स, Jio म्यूझिक आणि Jio सिनेमा असणार आहे. यात कंपनीचे सोशल नेटवर्कींग अॅप देखिल असेल. Jio फोनमध्ये व्हॉइस कॉल नेहमीसाठी फ्री असेल. यात व्हॉइस असिस्टंट असेल, याद्वारे तुम्ही केवळ आवाजाने कॉल लावू शकाणार आहात. 

प्रश्न: प्रत्येक महिण्यात किती रूपयांचे रिचार्ज करावे लागेल?
उत्तर:
Jio फोन घेतल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिण्याला केवळ 153 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. यात दररोज 4G नेटवर्कचा 500MB डाटा मिळेल. 500MB डाटा मिळ्यानंतर डाटाची स्पीड कमी होईल. 

प्रश्न: 153 रुपयांव्यतिरिक्त दुसरे काय प्लॅन आहेत? 
उत्तर:
150 रुपयांशिवाय कंपनीने 53 रुपये आणि 23 रुपयांचे छोटे प्लॅनदेखिल लॉन्च केले आहेत. 53 रुपयांत एका आठवड्यासाठी आणि 23 रुपायांत 2 दिवसांसाठी तुम्ही Jio नेटवर्कचा वापर करू शकाल.

पुढील स्लाइडवर पाहा, हे आहे Jio चे खास वैशिष्टये...
बातम्या आणखी आहेत...