आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉल ड्रॉपच्या त्रासातून सुटका शक्य, सरकारने दिले विशेष लेखा परीक्षणाचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कॉल ड्रॉपच्या त्रासातून लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. सरकारने ही समस्या गांभीर्याने घेत नेटवर्कच्या विशेष लेखा परीक्षणाचे आदेश दिले. त्यासाठी एक प्रणाली तयार करण्याचे निर्देश ट्रायला सांगितले. मोबाइल ऑपरेटर्सकडे पुरेसे स्पेक्ट्रम असून नेटवर्क अपडेट करण्याची त्यांची जबाबदारी आहे, असे दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

कॉल ड्रॉप कशामुळे?
किरणोत्सर्गामुळे टॉवर लावण्यासाठी जागा मिळत नाही, त्यामुळे सेवेची गुणवत्ता बिघडत आहे, अशी मोबाइल कंपन्यांची तक्रार आहे. कॉल ड्रॉपसाठी त्यांच्याकडून हेच कारण सांगितले जाते. प्रसाद यांनीही त्यांचे समर्थन केले.