मुंबई- रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (AGM) मुकेश अंबानी यांनी Reliance Jio 4G सेवेची गुरुवारी अधिकृत घोषणा केली. यासोबत रिलायन्सच्या डाटा आणि व्हाईस प्लानवरील पडदा उठवला आहे. Reliance Jio ने 149 रुपयांपासून 4999 रुपयांपर्यंतचे एकूण 7 वेगवेगळे डेटा प्लान सादर केले आहेत. ग्राहक
आपले गरजेनुसार प्लानची निवड करून सेवेचा लाभ घेऊ शकता.
गुंतवणूकदारांना संबोधित करताना अंबानींनी सांगितले की, Jio 4G सिम खरेदी करणाऱ्या ग्राहकांना डिसेंबरपर्यंत एसटीडी कॉल्स आणि इंटरनेट सेवा मोफत दिली जाणार आहे. यासोबतच संपूर्ण देशात रोमिंग फ्री, सणांच्या दिवशी मोफत मेसेजिंग सेवा तसेच विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के अतिरिक्त मोफत डाटा अशी धम्माल वेलकम ऑफरदिली जाणार आहे. रिलायन्स jio ने 'जी भरके' ऑफरसोबत ग्राहकांना स्वस्त स्वस्त दरात अर्थात अवघ्या 50 रुपयांत 1 GB डेटा मिळणार आहे. देशातील 18 हजार शहरांसह 2 लाख गावांमध्ये रिलायन्सने आपली Jio 4G सेवा सुरु केली आहे.
5 सप्टेंबरपर्यंत देशभरात Jio 4G सिम उपलब्ध करून देण्यात येणार असून ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत मोफत सेवेचा लाग घेता येईल.