आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know About Smartphone Maker Ringing Bells Pvt Ltd

जाणून घ्या, 251 रुपयांमध्ये स्मार्टफोन विकणाऱ्या \'रिंगिंग बेल\'विषयी सबकुछ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रिंगिंग बेल या भारतीय कंपनीने केवळ 251 रुपयांमध्ये स्मार्टफोन विकण्याची घोषणा करुन भारतीय बाजारपेठेत खळबळ उडवून दिली आहे. विशेष म्हणजे या किमतीत अपडेटेड टेक्नॉलॉजी असलेला स्मार्टफोन ग्राहकांना दिला जाणार आहे. पण या पार्श्वभूमिवर रिंगिंग बेल नावाच्या कंपनीविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. आम्ही आपल्याला या पॅकेजच्या माध्यमातून या कंपनीची उपलब्ध सर्व माहिती देणार आहोत.
रिंगिंग बेल नावाच्या या कंपनीची स्थापना 16 सप्टेंबर 2015 रोजी म्हणजेच केवळ पाच महिन्यांपूर्वी झाली आहे. मोहितकुमार गोयल, सुषमा देवी आणि राजेश कुमार या कंपनीचे संचालक आहेत. कार्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीच्या बेवसाईटवर या कंपनीची नोंद आहे. विशेष म्हणजे या कंपनीची ringingbells.co.in नावाची अधिकृत वेबसाईटही आहे.
आम्ही कंपनीच्या संचालकांविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यात आढळून आले, की पश्चिम उत्तर प्रदेशातील हे व्यावसायीक आहेत. ड्राय फ्रुट्स, साखर, मसाल्याचे पदार्थ, तांदूळ, दाळी आदी आग्रिकल्चर कमॉडीटी प्रोडक्टमध्ये ते काम करतात. मोबाईल फोन निर्मितीचा त्यांच्याकडे कोणताही अनुभव नाही. पण तरीही मोबाईलच्या बाजारपेठेत घुसखोरी करण्यासाठी अत्यल्प दरांना मोबाईल फोन विक्री करण्याचा फंडा या कंपनीने अवलंबला आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, कंपनीकडे सध्या किती कर्मचारी आहेत... किती स्मार्टफोन कंपनीकडून तयार करण्यात आले आहेत...