आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lenovo Dual Selfi Camera Smartphone Launch Today In India

Lenovo चा ड्युअल सेल्फी कॅमेर्‍याचा स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्‍या फीचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Lenovo कंपनीने आज, 23 नोव्‍हेंबरला नवी दिल्ली येथे एका इव्‍हेंटचे आयोजन केले होते. यात कंपनीने जगातील पहिला ड्युअल सेल्‍फी कॅमे-याचा Vibe S1 स्‍मार्टफोन लॉन्च केला आहे. याची किंमत 15,999 रुपये आहे. हा फोन एक्सक्लूसिव्‍हवर ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझोन इंडिया वर उपलब्ध होणार आहे.
Lenovoने Vibe S1 स्‍मार्टफोन यंदा सप्‍टेंबरमध्‍ये IFA इव्‍हेंटमध्ये सादर केला होता. या डिव्‍हाइससोबत कंपनीने नवा आयडियापॅड, योगा टॅबसह तीन नवे स्मार्टफोन्स सादर केले होते.
काय वैशिष्ट्ये -
Lenovo Vibe S1 स्‍मार्टफोनमध्‍ये सर्वात विशेष म्‍हणजे यात ड्युअल फ्रंट कॅमेरा आहे. कॅमेरा खास हाय क्वॉलिटी सेल्फीसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.
असे असतील दोन कॅमेरे-
यात एक कॅमेरा फोटो डिटेलवर काम करेतो तर दूसरा कॅमेरा फोटोला री-फोकसचे काम करतो. दोन्‍ही कॅमेरे एका काम करतात. यात एक कॅमेरा हाय क्वॉलिटी फोटो तयार करतो.
Vibe S1 स्‍मार्टफोनचे फीचर्स-
* फुल HD स्क्रीन
* 1.7 GHz ऑक्टा-कोअर मीडियाटेक प्रोसेसर
* 3GB रॅम
* कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन
* 5 इंचाचा फुल HD डिस्प्ले
* 1080X1920 पिक्सल रेझोल्यूशन
* 64 बिट 1.7 GHz ऑक्टा-कोअर प्रोसेसर
* 3GB रॅम
* 32GB इंटरनल मेमरी
* अँड्रॉइड 5.0 ऑपरेटिंग सिस्टीम
* 4G
* 3G
* ब्लूटूथ
* GPS
* 2500 mAh पॉवर बॅटरी

या लो बजेट सेल्फी स्मार्टफोनशी स्‍पर्धा-
Lenovo कंपनीचा ड्युअल सेल्‍फी कॅमे-याचा स्‍मार्टफोन हायटेक कॅमेरा आणि फीचर्ससह येत आहे. परंतु, युजर्सला याला ऑप्‍शन म्‍हणून भारतीय बाजारात 10 हजार रूपयांपेक्षा कमी किमतीतील अनेक फोन उपलब्‍ध आहेत. यामुळे Vibe S1 स्‍मार्टफोनची स्‍पर्धा या फोनशी होऊ शकते. तर आज आम्‍ही आपल्‍याला अशाच 10 स्‍मार्ट फोनविषयी माहिती देत आहोत.
पुढील स्‍लाइडवर वाचा 10 बजेट स्‍मार्टफोनविषयी माहिती...