आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही मिनिटांतच विकले गेले हजारो स्मार्टफोन, पाहूया काय आहे विशेष...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने असे सांगितले आहे की, त्यांनी फक्त 15 मिनिटांतच Lenovo K6 Power चे 35,000 हँडसेट विकले. हा सेल 13 डिसेंबरला रात्री 12 वाजता सुरु झाला. फक्त 15 मिनिटेच तो चालला. या स्मार्टफोनचा हा दुसरा सेल होता. कंपनीने Lenovo K6 Power ला अधिकृतरित्या 29 नोव्हेंबरला लॉन्च केले होते. ई-कॉमर्स पार्टनर फ्लिपकार्टवर याची विक्री करण्यात आली.
असे काय आहे या स्मार्टफोनमध्ये...
Lenovo च्या स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये आहे. कमी किमतीमध्ये असलेला हा बजेट फोन पावरफुल हार्डवेअर आणि हायटेक फीचर्सने सज्ज आहे.
फोनमध्ये 4000mAh ची पावरफुल बॅटरी असून कंपनी असे सांगितले आहे की, एकदा फुल चार्ज केल्यावर 2 दिवसांपेक्षा जास्त बॅकअप मिळू शकतो. म्हणजे चित्रपट बघायला, इंटरनेट चालवायला आणि गाणी ऐकल्यानंतरही यूजर्सला 50 तासापर्यंत बॅटरी बॅकअप मिळू शकतो.

पुढच्या आठवड्यात पुढचा सेल
असे यूजर्स जे पहिल्या आणि दुसऱ्या फ्लॅश सेलमध्ये Lenovo K6 Power खरेदी करू शकले नाहित त्यांच्यासाठी 18 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान आणखी एक सेल सुरु होणार आहे. फ्लिपकार्टवर या सेलला रात्री 12 PM ला सुरुवात होईल. मागणीला अनुसरून मोबाईल हँडसेटचा प्रचंड सेल होऊ शकतो.
या मोबाइल हँडसेट विक्रीला चांगला प्रतिसाद मिळू शकतो.
पुढील स्लाईड वर बघूया Lenovo K6 Power ची इतर वैशिष्ट्ये...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...