आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2GB रॅम, 13MP कॅमेऱ्यासोबत लॉन्च झाला लेनोवोचा 4G K3 Note, किंमत 9999 रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - लेनोवो कंपनीने त्यांचा मिड रेंज स्मार्टफोन K3 नोट (killerNote) आज भारतात लॉन्च केला आहे. हा लॉन्चिंग इव्हेंट नवी दिल्लीत पार पडला. लेनोवो ही स्मार्टफोन बनवणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.
किंमत आणि उपलब्धता-
* कंपनीने या स्मार्टफोनची किंमत 9999 रुपये ठेवली आहे. यूजर्सला हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून विकत घेऊ शकतात. आज दुपारी दोन वाजेपासून फ्लिपकार्टवर या मोबाईलचे रजिस्ट्रेशन करता येईल.
कंपनीने हा स्मार्टफोन यापूर्वी चीनमध्ये लॉन्च केला होता. तेव्हा या फोनची किंमत 9300 रुपये एवढी ठेवण्यात आली होती. हा स्मार्टफोन Meizu m1 नोट याच्या स्पर्धेत लॉन्च करण्यात आला आहे. Meizu m1 नोटची भारतात किंमत 11,999 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. फीचर्सच्या बाबतीत हे दोन्ही स्मार्टफोन एकसारखेच आहेत. यामध्ये फरक केवळ किंमतीचाच आहे.
काय आहे विशेषः
या फोनवर संगीत ऐकणे खुपच मजेशीर ठरेल. कारण कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 5 साउंड इक्विलाइजर मोड दिला आहे.

कसे आहेत लेनोवो K3 नोटचे फीचर्स -
लेनोवोचा हा नवा K3 नोट स्मार्टफोन 4G नेटवर्क सपोर्ट करतो. यामध्ये ड्यूअल सिम(GSM+GSM) चा वापर करता येतो.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, लेनोवो K3 नोटचे इतर फीचर्स...