आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील पहिला \'टॅंगो स्मार्टफोन\'ची विक्री सुरू, एकाच वेळी 4 कॅमेर्‍याने काढू शकाल 3D फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅझेट डेस्क- जगातील पहिला टँगो स्मार्टफोन Lenovo Phab 2 Pro विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाला आहे. हा फोन म्हणजे लेनोवो आणि गुगलचा जॉइंट व्हेन्चर आहे. दोन्ही कंंपन्यांनी मिळूून या फोनची निर्मिती केली आहे. यूजर्स हा फोन ऑनलाइन खरेदी करू शकतात. या फोनची किंमत 500 डॉलर (33,300 रुपये) आहे. स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये सांगायचे झाले तर, हा फोन 4 कॅमेर्‍यांनी अद्ययावत आहे. तीन बॅक साइडला आणि एक फ्रंटला आहे. खास म्हणजे एकाच वेळी चार कॅमेर्‍याने 3D फोटो क्लीक करता येईल.

चला तर मग पाहूया टॅंगो फोनचे स्माार्ट फीचर्स...
टॅंगो प्रोजेक्ट - पर्यावरण जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून फोनमध्ये काही सेन्सर्स बसवण्यात आले आहे. या प्रोजेक्टचे नेतृत्त्व जॉनी ली करत आहेत. प्रगत तंत्रज्ञान आणि प्रकल्प गटाने टॅंगो फोनची निर्मिती केली आहे.
अशी असेल 3 कॅमेर्‍यातून काढलेली 3D इमेज
या स्मार्टफोनमध्ये 3D मशीन व्हिजन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. फोनच्या कॅमेर्‍यामध्ये 3 व्हर्टिकल लेन्स बसवण्यात आले आहे. यांंच्या मदतीने तुम्ही प्रत्येक इमेजला 3D इफेकट्स देऊ शकतात.
स्मार्टफोनसाठी खास टॅंगो अॅप्स
या स्मार्टफोनसाठी गुगलने खास 22 टँगो अॅप्स बनवल्या आहेत. गूगल प्ले स्टोअरवर त्या उपलब्ध आहेत.

यामध्ये यूटिलिटी आणि विविध गेम्स अॅप्सचा समावेश केला आहे. म्हणजे Phab 2 Pro खरेदी करून या अॅप्सचा आनंद घेता येऊ शकतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या Lenovo Phab 2 Pro चे इतर खास फीचर्स...