आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 दिवस विनाचार्ज करता चालेल LG चा स्मार्टफोन; 4500 mAh ची पॉवरफूर बॅटरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- MWC-2017ला 27 फेब्रुवारीला प्रारंभ होणार आहे. मात्र, एक दिवस आधीच LG ने आपला मिड रेंज न्यू स्मार्टफोन X power2 लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याची पॉवरफूल बॅटरी.

स्मार्टफोनसोबत कंपनीने 4500 mAh बॅटरी दिली आहे. 3 दिवस विनाचार्ज करता LG चा स्मार्टफोन चालेल, असा दावा कंपनीने केला आहे. फास्ट चार्जिंगला बॅटरी सपॉर्ट करते.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, LG X power2 फोनवर सलग 15 तास व्हिडिओ प्ले करू शकता. 14 तासांपर्यंत नॅविगेशन करता येईल. इतकेच नाही तर 18 तासांपर्यंत वेब सर्फिंग करता येईल. एका तासांत बॅटरी 50 टक्के चार्ज होईल.

ब्लॅक टायटन, शाइनी टायटन, शायनी गोल्ड आणि शायनी ब्लू कलर्समध्ये उपलब्ध आहेत. अमेरिकेत मार्चमध्ये, नंतर आशिया आणि यूरोपमध्ये फोन लॉन्च करण्‍यात येणार आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, LG X power2 फोनमधील इतर फीचर्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...