आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SBIने पैसे पाठवणे केले अधिक सोपे, ई-मेल- मोबाइल नंबरवर पाठवा पैसे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकने (एसबीआय) पैसे पाठवणे अधिक सोपे केले आहे. आता पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला बँक खाते क्रमांक लिहिण्याची आवश्यकता नाही. ज्या व्यक्तीला तुम्हाला पैसे पाठवायचे आहे तिचा मोबाइल नंबर किंवा ई-मेल टाकून तुम्ही सोप्या पद्धतीने पैसे पाठवू शकता. यासाठी एसबीआयने एम-कॅश सेवा सुरू केली आहे. याचा वापर नेट बँकिंग किंवा मोबाइल अॅपच्या माध्यमातून करता येणार आहे.
एम-कॅश सेवेचा लाभ घेण्यासाठी एसबीआय खातेधारकाने इंटरनेट बँकिंग सेवा अॅक्टिव्हेट करणे अनिवार्य आहे. यानंतर बँकची वेबसाइट www.onlinesbi.com वर जाऊन एम कॅश टॅबला क्लिक करा. ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे असेल त्या व्यक्तीचा मोबाइल नंबर िकंवा ई-मेलची माहिती टाका. यानंतर पैसा मिळणाऱ्या व्यक्तीला बँकेच्या वतीने एक लिंक पाठवण्यात येईल. एसबीआयप्रमाणेच काही खासगी क्षेत्रातील बँकांनीदेखील मोबाइल अॅपच्या माध्यमातून या प्रकारची सेवा सुरू केली आहे.

पिंगपे (PingPay) : अॅक्सिस बँकेचे पिंगपे अॅपदेखील पैसे पाठवण्याची सुविधा देते. या अॅपच्या माध्यमातून टि्वटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ई-मेलद्वारे पैसे पाठवता येतात. ज्याला पैसे पाठवायचे आहे तो अॅक्सिस बँकेचा खातेधारक नसला तरी चालतो.
चिल्लर अॅप (Chillr) : एचडीएफसी बँकदेखील चिल्लर अॅपच्या माध्यमातून कोणत्याही मोबाइल ग्राहकाला पैसे पाठवण्याची सुविधा देते.
पॉकेट्स अॅप : आयसीआयसीआय बँकेकडे पैसे पाठवण्याऱ्यांसाठी दोन सेवा आहेत. एक पॉकेट्स अॅप आणि दुसरे ई-वाॅलेट. या माध्यमातून फेसबुक युजर्सला पैसे पाठवता येतात. ई-वाॅलेट अॅप्लिकेशनच्या माध्यमातून फेसबुकव्यतिरिक्त ई-मेल किंवा मोबाइल नंबरवर पैसे पाठवता येतात.

एका व्यवहारासाठी २.५ रुपये लागणार
एसबीआयच्या एम-कॅश सेवेच्या माध्यमातून पैसे पाठवल्यास एका व्यवहारासाठी २.५ रुपये सेवाकर द्यावा लागणार आहे. या सुविधेचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे पाठवणार आहात त्या व्यक्तीला नेटबँिकंग सुरू करण्याची आवश्यकता नाही. या मुळे कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवणे सोपे झाले आहे.
एसएमएस - मेलवर माहिती
ज्या व्यक्तीला पैसे पाठवण्यात आले आहे तिला एसएमएस किंवा मेलवर बँकेच्या वतीने लिंक पाठवण्यात येईल. त्यानंतर तिला ८ अंकी पासवर्ड मिळेल. यानंतर तिला आपले बँक खाते, आयएफएस कोड, पासवर्ड आणि मोबाइल किंवा मेल आयडी टाकावा लागेल. त्यानंतर त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा होतील. मोबाइलवरदेखील अॅपच्या माध्यमातून एम-कॅश सेवेचा फायदा मिळेल. विशेष म्हणजे तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्या व्यक्तीचे एसबीआयमध्ये खाते नसेल आणि इतर कोणत्याही बँकेत खाते असले तरी चालेल.