आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्क झुकरबर्गच्या घरी पाळणा हलणार, प्रशिलाचा तिनदा झाला होता गर्भपात!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल नेटवर्किंग साईट 'फेसबुक'चे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. झुकरबर्ग यांनी स्वत: ही गुड न्यूज शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास जाहीर केली. झुकरबर्ग यांनी आपल्या 'फेसबुक' अकाउंटवर पोस्ट शेअर करून हा आनंद जाहीर केला आहे. झुकरबर्ग यांच्या पोस्टवर लाइक्स आणि शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव होत आहे.
झुकरबर्ग पहिल्यांदा वडील होत असू्न त्याच्या घरी मुलगी जन्म घेणार असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
'माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी एक गुड न्यूज आहे. आमच्या घरी नवा पाहुणा येत आहे. आता आमच्या आयुष्याचे नवे चॅप्टर सुरु होईल. आम्ही खूप भाग्यशाली आहे. पत्नी प्रशिला लवकरच एका मुलीला जन्म देणार आहे. मी बाप बनणार आहे. आमचे अनुभव तुम्हाला वाटू इच्छीतो'. असेही झुकरबर्ग यांनी म्हटले आहे.
आम्ही अनेक वर्षांपासून आपत्याच्या प्रतिक्षेत आहोत. प्रशिलाचा यापूर्वी तिनदा गर्भपात झाला होता. परमेश्वर पुन्हा एकदा आमच्या आयुष्यात आनंद घेऊन आल्याचे झुकरबर्ग यांनी म्हटले आहे.

मैत्रिणीसोबत 2012 मध्ये केला विवाह
झुकरबर्ग यांनी फारच वेगळ्या पद्धतीने विवाह केला होता. 19 मे 2012 रोजी कॅलिफोर्नियातील मार्क यांच्या घराच्या मागच्या बाजूला जमलेल्या लोकांना ते लग्नासाठी आले असल्याचे माहिती नव्हती. मैत्रिण प्रशिलासोबत मार्क यांनी विवाह थाटला. 14 मेच्या पाच दिवस आधीच मार्क यांनी कंपनीच्या सर्वात मोठा आयपिओ नॅस्डेकला शेअरमध्ये उतरवले होते. प्रशिला या मेडिकल ग्रॅज्युएट आहेत. आपले नाते FACEBOOK वर आपडेट करत मार्क आणि प्रशिला विवाहबद्ध झाले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, मार्क म्हणतात- 'धोका न पत्कारणे हाच सर्वात मोठा धोका'