आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अ‍ॅप’ वर जुळणार लग्नाच्या गाठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हणतात; परंतु आजच्या ‘स्मार्ट’ युगात या गाठी ‘अ‍ॅप’वरच गुंफल्या जाणार आहेत. हे नवीन नाते जुळवण्यासाठी ‘मॅचिफाय’ या नव्या अ‍ॅपचे आगमन झाले आहे.

मॅट्रिमोनी डॉट कॉम लिमिटेडने आपल्या या १०० टक्के मालकीच्या ‘मॅचिफाय सर्व्हिसेस प्रा.लि.मध्ये गुंतवणूक केली असून त्या माध्यमातून ही सेवा देण्यात येणार आहे.

आजच्या तरुणाईची पसंती जाणून घेऊन मॅचिफाय हे समविचारी व्यक्तींसाठी मोबाइलवरील एक सुरक्षित अ‍ॅप आहे. खास महिलाकेंद्रित या अ‍ॅपमध्ये अनेक नावीन्यपूर्ण वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला असल्याचे मॅचिफाय डॉट इनच्या व्यवसाय प्रमुख साई चित्रा यांनी सांगितले. सध्या हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून लवकरच ते अन्य प्लॅटफॉर्मवरही आणण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलास्नेही वैशिष्ट्ये अशी :
- पडताळणी केलेले प्रोफाइल्स सुरक्षित चॅट
- महिला पुरुषांशी थेट बोलू शकतात (पण पुरुष मात्र केवळ दोघांनीही लाइक केलेले असल्यासच बोलू शकतात), - प्रोफाइल कोण पाहू शकते आणि चित्रे यांच्यावर नियंत्रण
- अ‍ॅब्युज रिपोर्ट/ब्लॉक यांचीही सोय
- वन वे व्हिडिओ चॅटची सुविधा.