आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खराब नेटवर्कमध्येही चालेल गुगलचे व्हिडिअो कॉलिंग ‘डुओ’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया - गुगलने मंगळवारी व्हिडिओ कॉलिंग अॅप “डुओ’ सादर केले. भारतासारख्या देशात खराब नेटवर्क असल्यामुळे गुगलने हे अॅप तयार केले असल्याचा दावा समूहाचे उत्पादन व्यवस्थापक अमित फुले यांनी केला आहे. या अॅपमुळे व्हिडिओ कॉलिंग सहज आणि सुलभ होणार आहे. या अॅपची घोषणा तीन महिन्यांपूर्वी मेमध्ये करण्यात आली होती. सध्यातरी हे अॅप फक्त अँड्रॉइड आणि अॅपलच्या ग्राहकांसाठी आहे. इतर ऑपरेटिंग सिस्टिमसाठीही लवकरच हे अॅप तयार करण्यात येणार आहे. डुओला गुगल प्ले स्टोअरमधून मोफत डाऊनलोड करता येणार आहे. अॅप सुरू करताच व्हिडिओ कॉलिंगचे बटण समोर येईल. त्यावर क्लिक करताच फोनमधील नंबरची यादी समोर येईल. या अॅपची स्पर्धा मायक्रोसॉफ्टचे स्काइप, फेसबुकचे मेसेंजर आणि अॅपलचे फेसटाइमसारख्या अॅपशी होणार आहे.

सर्वात विशेष ‘नॉक नॉक’ : या अपमध्ये “नॉक नॉक’ फीचर सर्वात विशेष आहे. यामध्ये कॉल रिसिव्ह न करताच कॉल करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ ३० सेकंदांपर्यंत पाहता येऊ शकतो. फेस टाइममध्ये असे होत नसून यामध्ये कॉल सुरू झाल्यानंतरच व्हिडिओ पाहता येतो. डुओमध्ये अँड टू अँड इनक्रिप्शन फीचरदेखील आहे. यामुळे सुरक्षिततेची हमी मिळते.

रिझोल्युशन कमी : हे अॅप खराब नेटवर्कमध्येदेखील स्पष्ट व्हिडिओ कॉलिंग सुविधा देण्यासाठी सक्षम असल्याचा दावा गुगलने केला आहे. खराब नेटवर्क असल्याचे लक्षात आल्यानंतर हे अॅप व्हिडिओचे रिझोल्युशन कमी करेल. यामुळे गती वाढेल.

कॉल ड्रॉप शिवाय स्विच
हे अॅप कॉल ड्रॉप न करता वायफाय आणि फोन नेटवर्कमध्ये स्विच करण्यातही सक्षम आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या लॉगइन, युजरनेम किंवा अकाउंटची आवश्यकता नाही. फेसटाइमप्रमाणे दोन लोकांचा क्रमांकही त्यासाठी पुरेसा आहे.

ऑपरेटिंग सिस्टिममध्येही
फेसटाइमध्ये दोघांकडेही आयफोन असणे आवश्यक आहे. मात्र, डुओमध्ये त्याची आवश्यकता नाही. यामध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम असणाऱ्या फोनवरून आयफोनवर व्हिडिओ कॉल करता येतो.

हँगआऊटपेक्षा वेगळ आहे डुओ
गुगलने आतापर्यंत हँगआऊट अॅपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलिंगची सुविधा दिलेली होती. ही सेवादेखील सुरूच राहणार आहे. यामध्ये दोनपेक्षा जास्त लोकांचा समूह कॉम्प्युटरवर किंवा मोबाइलवर व्हिडिओ कॉल करू शकतो. डुओमध्ये मात्र दोघांमध्येच चर्चा करता येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...