आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर Micromax Canvas 5 लॉन्च; मिडरेंजमध्ये हायटेक फीचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मायक्रोमॅक्स कंपनीने अखेर आपला बहुप्रतिक्षीत स्मार्टफोन 'Canvas 5' लॉन्च केला आहे. 2013 मध्ये कंपनीने Canvas 4 लॉन्च केला होता. त्यानंतर तब्बल दोन वर्षांच्या अंतराने Canvas 5 बाजारात उरतवला आहे.

मायक्रोमॅक्स कंपनीचे CEO विनीत तनेजा यांनी नवी दिल्लीत एका इव्हेंटमध्ये Canvas 5 स्मार्टफोन लॉन्च केला. Canvas 5 ची किंमत 11,990 रुपये ठेवण्यात आली आहे. मिड-रेंजमध्ये कंपनीने आपल्या न्यू फोनमध्ये शानदार फीचर्स दिले आहेत. रिटेल तसेच ऑनलाइन या दोन्ही चॅनल्समध्ये हा फोन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या फोनसोबत युजरला एअरटेलची डाटा ऑफर देखील मिळणार आहे.

4G कनेक्टिव्हिटी, बेस्ट इन क्लास प्रोसेसिंग पॉवर, बेहतर स्क्रीन, लॉन्ग लास्टिंग बॅटरी व शानदार डिझाइन या पाच पॉईंट्सवर Canvas 5 काम करेल.

Micromax Canvas 5 चे स्मार्ट फीचर्स...
> 4G LTE कनेक्टिव्हिटी
> 5.2 इंचाचा फुल एचडी (1080X1920 पिक्सल रेजोल्यूशन) डिस्प्ले स्क्रीन
> ऑक्टा-कोअर 1.3GHz स्पीड असलेला प्रोसेसर (MTK 6753)
> 3GB रॅम
> 16GB इंटरनल स्टोरेज

पुढील स्लाइड्सवर वाचा, Micromax Canvas 5 चे सविस्तर फीचर्स...