आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Micromax Yu Yureka Plus झाला स्वस्त, 1000 रुपयांची सूट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Micormax ने आपला बहुचर्चित स्मार्टफोन Yu Yureka Plusच्या किमतीत कपात केली आहे. कंपनीने हॅंडसेटवर एक हजार रुपयांची सूट दिली आहे. यूजर्सला आता हा हँडसेट 8,999 रुपयांत खरेदी करता येईल. कंपनीने हा फोन गेल्या महिन्यात 9,999 रुपये किमतीत लॉन्च केला होता.

Yu Yureka Plusच्या किमतीत कपात केल्याची घोषणा कंपनीने आपल्या अधिकृत 'ट्विटर' आणि 'फेसबुक' अकाउंटवरून केली आहे. विशेष म्हणजे ज्या यूजर्सनी हा हँडसेट 9,999 रुपयांत खरेदी केला असेल त्यांना 'अमेजन इंडिया'तर्फे एक हजार रुपये किमतीचे गिफ्ट व्हाउचर दिले जाईल. ही प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण करण्‍यात येणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले आहे.

Micromax Yu Yureka Plus हा फोन Lenovo K3 Note ला टक्कर देत आहे. K3 Noteची किंमत 9999 रुपये आहे. भारतीय यूजर्समध्ये हा फोन चांगलाच लोकप्रिय ठरला आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, Micromax Yu Yureka Plusचे पॉवरफूल फीचर्स...