आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल फोन विक्रीसाठी कंपन्यांत स्पर्धा, फायदा मात्र ग्राहकांना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅपलने फक्त तीन दिवसांत एक कोटी ३० लाख आयफोन विकल्याची घोषणा २८ सप्टेंबर रोजी केली होती. व्यवसायाच्या दृष्टीने हा त्यांच्यासाठी महत्वाचा आठवडा होता. कोणत्याही उत्पादनाबाबत सर्वाधिक विक्रीचा हा विक्रम होता. आयफोन -६ च्या फीचर्सनेच लोकांना आकर्षित केले असावे, असा याचा अर्थ होत नाही. कॅलिफॉर्नियामधील कुपटीनोने या कंपनीने ग्राहकांना मासिक हप्त्यावर फोन देऊ केले आहे. त्यामुळे ग्राहक या योजनेकडे आकर्षित होऊन दरवर्षी नवीन उत्पादन घेऊ शकतात. या योजने अंतर्गत अनेक लोकांनी दोन-दोन आयफोन खरेदी केले.

अमेरिकेत मागील काही महिन्यांत फोन विकत घेण्याचा ट्रेंड बदलला आहे. टी- मोबाइल या कंपनीने यास सुरुवात केल्यानंतर वेरिजॉन वायरलेससारख्या मोठ्या ऑपरेटरनेही दोन वर्षांचा करार समाप्त केला. या सुविधेनुसार संबंधित ऑपरेटरची सेवा २ वर्षे घेतल्यास फोन स्वस्तात मिळायचे. एटीअँडटी, स्प्रिंट कंपन्या परंपरागत आणि करारमुक्त योजना देतात. त्यामुळे ग्राहकांनी पूर्ण पैसे चुकते करण्याऐवजी अॅपलसारखे दीर्घकालीन हफ्तेवारीचे पर्याय निवडावे. रिपब्लिक वायरलेससारख्या नव्या कंपन्यांनी फोन कॉल किंवा वेब ब्राउजिंगसारख्या स्थानिक वायरलेस नेटवर्कचा पर्याय मासिक बिल कमी करण्यासाठी निवडला आहे. तज्ज्ञांच्या मते, या परिवर्तनामुळे ग्राहकांना फायदा होत असून आता त्यांच्याकडे जास्त पर्याय उपलब्ध आहेत.

फोन खरेदी करण्यासाठी उपलब्ध काही पर्याय
कोणत्याही ऑपरेटरची सेवा घेणाऱ्या फोनची संख्या वाढत आहे. यामुळे योग्य प्लानच्या शोधात असलेले ग्राहक ऑपरेटर बदलू शकतात. मासिक बिल कमी करण्याच्या उद्देशाने एफआयसारखे गूगल प्रोजेक्ट वाय-फायचा वापर करत आहेत. अद्याप, या प्रकल्पांत जास्त हँडसेट जोडले गेलेले नाही.

उदाहरण- अविरत संवाद, संदेश आणि ३ जीबी मोबाइल डाटासाठी व्हेरिजॉनचा नवा मासिक प्लान ४२०० रुपयांत उपलब्ध आहे. दुसरीकडे याच सुविधा देणारा गुगलचा एफआयचा मासिक प्लान ३२०० रुपयांत दिला जातोय.

काही नवीन प्लान - अॅपलच्या आयफोन अपग्रेड प्रोग्राम अंतर्गत ग्राहक दरमहा २००० रुपये देऊन दरवर्षी नवीन आयफोन घेऊ शकतात. दीर्घ कालावधीसाठी हे पॅकेज महाग आहे. अॅपलची प्रतिस्पर्धी कंपनी गुगल अँड्रॉइडवर चालणाऱ्या डिव्हाइससाठी अशाप्रकारची योजना आखत आहे.
उदाहरण- १६ जीबी आयफोन ६ एसची किंमत ४२ हजार रुपये आहे. अॅपल अपग्रेड प्लानअंतर्गत तो ५० हजारांपेक्षा जास्त किमतीत जातो.
प्लान बदलण्याचे स्वातंत्र्य - टेलिकॉम ऑपरेटरसोबतचे दोन वर्षांचा करार संपल्यानंतर ग्राहक अधिक चांगले पॅकेज देणाऱ्या ऑपरेटरची निवड करू शकतात. मात्र, ऑपरेटरच्या मासिक पेमेंट प्लानच्या माध्यमातून फोन खरेदी केल्यास पूर्ण पैसे फेडेपर्यंत सेवा सोडता येत नाही.
उदाहरण- ३२ जीबीच्या एका स्मार्ट फोनची किंमत एटीअँडटीच्या दोन वर्षीय करारात ८३०० रुपये आहे. ३० महिन्यांच्या कालावधीत दरमहा १२६५ रुपयांच्या हप्त्याने फेडल्यास त्याची किंमत ३७ हजारांच्या घरात जाते.
बातम्या आणखी आहेत...