आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइलमध्ये इमर्जन्सी बटणची कल्पना यांचीच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनिरुद्धसिंह, संशोधक
वय : सुमारे ४० वर्षे
वडील : लोकेंद्रसिंह वर्मा
शिक्षण : दिल्ली विद्यापीठातून पदवी, एनडीआयएममधून एमबीए.
चर्चेतका? : सरकारनेत्यांच्या तंत्रज्ञानाच्या आधारावर कायदा तयार केला आहे.
काही वर्षांपूर्वीची गोष्ट. अनिरुद्ध नोकरीहून आपल्या दुचाकीने घरी परतत होते. हेल्मेट घातलेले होते. त्याच वेळी एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. कारचालक फोनवर बोलत होता. अनिरुद्ध यांना गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. आयुष्याच्या या संघर्षात ते विजयी झाले, पण तीन महिने अंथरुणावरच पडून राहावे लागले. पीडिताच्या नातेवाइकांना अपघाताची सूचना मिळू शकेल अशी व्यवस्था फोनमध्ये असावी, त्याला पूर्ण नंबर लावण्याची गरज पडू नये, फक्त एका बटणाने काम व्हावे, हे महिलांसाठी खूप उपयुक्त ठरू शकेल असा विचार तेव्हाच त्यांच्या मनात आला. मोबाइलवर बोलताना लोक कुठल्या चुका करतात आणि काय आवश्यक आहे याकडेच त्यांचे लक्ष असायचे.
एमबीएकेल्यानंतर त्यांनी बँकिंग आणि मोबाइल कंपन्यांत काम केले होते. त्यामुळे अनुभवाची कमतरता नव्हतीच. पण मोबाइलचा योग्य पद्धतीने उपयोग करण्याची सवय बदलण्याची इच्छा निश्चितच होती. वडील लोकेंद्रसिंह यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी प्रोत्साहित केले. तेव्हा मरीन इंजिनिअर मनू सिंह, आयआयटी खरगपूरचे माजी प्राध्यापक डॉ. प्रो. वाय. पी. सिंह आणि आणखी एकाला सोबत घेऊन तंत्रज्ञान तयार केले. त्यांनी असे तंत्रज्ञान बनवले की, ज्यात वाहन चालवताना फोन पूर्णपणे जाम व्हावा. त्याचबरोबर अशी व्यवस्था होती की अॅप उघडताच मोबाइलमध्ये एक बटण दाबल्यास ती व्यक्ती अडचणीत आहे हे एकाच वेळी तीन क्रमांकावर कळवता यावे. त्यासाठी त्यांनी पेटंटही केले आहे. त्यात कुठल्याही आपत्कालीन स्थितीत आपल्या जवळच्या नातेवाइकांना या बटणद्वारे माहिती देता येईल. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. सर्व मोबाइल कंपन्यांना मोबाइलमध्ये इमर्जन्सी बटण ठेवणे अनिवार्य करणारा कायदा मोदी सरकारने आणला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी असे करणारे हे सरकार जगातील पहिले सरकार आहे. हा कायदा जानेवारी २०१७ पासून लागू होत आहे.
बातम्या आणखी आहेत...